digital products downloads

’25 हजार कोटी..’, टिपू सुलतानचा Ind vs Pak मॅचशी संबंध जोडत राऊतांचा हल्लाबोल; ‘फडणवीस आणि भाजपची..’

’25 हजार कोटी..’, टिपू सुलतानचा Ind vs Pak मॅचशी संबंध जोडत राऊतांचा हल्लाबोल; ‘फडणवीस आणि भाजपची..’

Sanjay Raut Connects Tipu Sultan Issue With India Pakistan T20 World Cup Match: सध्या राज्यामध्ये टिपू सुलतान प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या टिपू सुलतान प्रकरणाचा संबंध आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

Add Zee News as a Preferred Source

ते ढोंगी लोक आहेत

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना टिपू सुलतान प्रकरणावरुन भाजपा आक्रमक झाल्याचा संदर्भ देत सवाल विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “आम्ही हा सामना पहातच नाही, हा भाजपचा खेळ आहे, निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान करायचे. पाकिस्तानवर बहिष्कार, बांगलादेशीना हुसकायचं. मात्र जेव्हा पैशांचा विषय येतो, तेव्हा जय शाह यांना परवानगी दिली जाते. पाकिस्तानात टिपू सुलतानला नायक मानले जाते, मग त्यांच्याशी का सामना खेळता? फडणवीस आणि भाजपची उर्मी भरून आलीय,” असा टोला राऊत यांनी लगावला. “त्यांनी धिक्कार करायला हवा होता, ते ढोंगी लोक आहेत, ते असं करणार नाही,” असंही राऊत म्हणाले. 

25 हजार कोटी पाकिस्तानला गेले

“भारत पाकिस्तान सामन्यावर मोठा जुगार खेळला जातो. मागच्यावेळी 25 हजार कोटी पाकिस्तानला गेले. यंदा जास्त जातील आणि हेच पैसे पुलवामा सारखे हल्ले करायला वापरले जातील. त्यांनी धिक्कार करावा ना? टिपू सुलतानला ते नायक मानतात, फोटो उतरवणे हे किरकोळ आहे,” असं राऊत म्हणाले.

सपकाळ आणि आम्ही काय ते बघून घेऊ

पुढे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानासंदर्भात राऊतांना विचारलं असता त्यांनी, “सपकाळ आणि काँग्रेसचे आम्ही बघू काय ते, आधी विषय कोणी घेतला? टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही. कोणीही काही बोलू द्या. मुंबईत भाजपने नाव दिलेत, मानखुर्द ला एका बगीचामध्ये नाव द्यायचा प्रयत्न झाला टिपू सुलतानचा. टिपू सुलतानला मानणारे सर्व भाजपमध्ये आहेत,” असा टोला लगावला. 

फडणवीसांची कठोर शब्दांमध्ये टीका

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.  हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करुन दोघांना सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुलचालन, जोडे चाटणे या जन्मात पाहिलेलं नाही अशा शब्दांत फडणवीसांनी सपकाळ यांच्यावर निशाणा साधला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp