digital products downloads

27 वर्षांपूर्वी तत्कालीन महसूलमंत्री म्हणून राणेंनी घेतला होता निर्णय: सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिलाच निकाल, राणेंसह बिल्डरांना दणका

27 वर्षांपूर्वी तत्कालीन महसूलमंत्री म्हणून राणेंनी घेतला होता निर्णय:  सरन्यायाधीश भूषण गवईंचा पहिलाच निकाल, राणेंसह बिल्डरांना दणका

  • Marathi News
  • National
  • Chief Justice Bhushan Gavai’s First Verdict, A Blow To Builders Including Rane, Rane Had Taken The Decision 27 Years Ago As The Then Revenue Minister

नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ ग्रहण केली. गुरुवारी त्यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील एका प्रकरणाचा दिला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील वन विभागाची ३० एकर जमीन १९९८ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी रिची रिच नावाच्या सोसायटीला दिली होती. तो निर्णय गवई यांनी रद्द केला. सध्या या जमिनीची किंमत बाजारभावाने किमान ४५० कोटी रुपये आहे. निकाल देताना सरन्यायाधीशांनी असाही ताशेरा मारला आहे की, – वन विभागाच्या जमिनी राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि बिल्डर्स कशा फस्त करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे रिची रिच सोसायटी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे बिल्डर अनिरुद्ध देशपांडे यांनी स्थापन केली होती.

चव्हाण नामक व्यक्तीच्या दाव्यावरून ही जमीन राणेंनी देऊ केली. त्याने ती रिची रीच सोसायटीला दोन कोटी रुपयांना विकल्यावर चेतना मंचने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पुरातत्त्वच्या रेकॉर्डवर नव्याने मजकूर छापला

राज्य पुरातत्त्व विभागाच्या मुंबई कार्यालयातील वनजमिनीचे रेकॉर्ड न्यायालयात डिसेंबर २०२३ मध्ये सोसायटीने सादर केले. मात्र, त्यात अर्ध्या कोऱ्या पानावर मजकूर छापण्यात आल्याचे दिसले. २०२४ मध्ये या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp