digital products downloads

28 जानेवारीला अजित पवारांचा अपघात, 27 ला कोणी फोन केला? प्रफुल्ल पटेलांनी पहिल्यांदाच दिली कबुली, ‘मीच फोन केला, पण…’

28 जानेवारीला अजित पवारांचा अपघात, 27 ला कोणी फोन केला? प्रफुल्ल पटेलांनी पहिल्यांदाच दिली कबुली, ‘मीच फोन केला, पण…’

Prafull Patel on Allegations of call to Ajit Pawar Plane Crash: अजित पवार आदल्या दिवशी कारने बारामतीत जाणार होते. ‘देवगिरी’ बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाड्यांचा ताफा सज्ज होता, पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याने दादांना थांबायला सांगितले असा दावा रोहित पवारांनी केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी तर प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं होतं. दरम्यान आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणात दुर्घटेसाठी जबाबदार आहे असंही मोठं विधान केलं. 

Add Zee News as a Preferred Source

“हो मी अजित पवारांना फोन केला होता. पण शेतकऱ्यांसाठी फोन केला होता, कोणाच्याही खासगी फाईलसाठी केला नव्हता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अनेकांचा फोन त्यांना आला असेल, निवेदनं दिली असतील. याचा अर्थ मी कोणत्याही कारणाने थांबवण्याचं काम केलं नाही. मी दिल्लीत होतो. मला माहितीही नव्हती. मी दिल्लीतून मोबाईलवरुन फोन केला होता. ते मुंबईत आहेत की इतर कुठे हेदेखील मला माहिती नव्हतं,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. 

 

“सीबीआयच्या चौकशीत पायलटचं दुर्लक्ष झालं असेल का? हे समजेल. हे नक्की आहे की जे काही झालं त्यात विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. मला प्राथमिक असं वाटतं की, नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणात दुर्घटनेसाठी जबाबदार आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे. 

“मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनके वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. मी संयमाने, जबाबदारीने आणि तथ्य असल्याशिवाय आरोप प्रत्यारोपाचं उत्तर देणं योग्य वाटत नाही,” असं सांगत त्यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला. 

 

“मी स्वायत्त संस्था एआयबीकडे चौकशी करु शकत नाही. त्यांचा अहवाल योग्य वेळी बाहेर येईल. अमेरिकेत लॅब आहे, तिथे ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला तरी डिकोड करण्यासाठी तंत्रज्ञ आहेत. अमेरिकेत पाठवून तिथून आणखी डिकोडिंग करुन माहिती मिळेल,” असं ते म्हणाले आहेत. 

अजित पवारांच्या निधनानंतर बरीच चर्चा झाली.  आमचा पक्ष वेगळा असताना, आमच्या पक्षाचं विधीमंडळाची नेतृत्व, संघटनेची जागा भरण्यासाठी जबाबदारी आमच्यावर आहे असंही ते म्हणाले. 

27 जानेवारीचा घटनाक्रम

अजित पवार आदल्या दिवशी कारने बारामतीत जाणार होते. ‘देवगिरी’ बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाड्यांचा ताफा सज्ज होता, पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याने दादांना थांबायला सांगितले. ‘‘एका महत्त्वाच्या फाईलवर सही करावीच लागेल, मी पोहोचतो’’ या निरोपानंतर ते सदर नेता दोन-तीन तास उशिरा पोहोचला. त्यामुळे जास्त उशीर झाल्याने अजित पवारांनी रस्ते मार्गाने बारामतीकडे जाण्याची योजना रद्द झाली. हा पूर्व विदर्भातील नेता कोण? असा सवाल रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. रोहित पवारांनी या नेत्याच्या नावाला उल्लेख केला नाही. मात्र अन्य एका नेत्याने याच घडामोडींच्या संदर्भातून थेट नेत्याचं नाव घेत विधान केलं आहे.

त्या संध्याकाळी कोणाच्या कामासाठी थांबले अजित पवार?

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी एका शोकसभेत बोलताना रोहित पवारांनी सांगितलेल्या घटनाक्रमाशी साधर्म्य सांगणारा घटनाक्रम सांगताना या नेत्याचं नाव घेतलं आहे. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती, परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले. त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांना गमावले”, असं प्रमोद हिंदुराव म्हणाले. प्रमोद हिंदुराव यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण दोन्ही वेगवेगळे दावे जोडून पाहताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी उल्लेख टाळलेला तो नेता हाच तर नव्हे ना? असा सवालही उपस्थित केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp