
शासन सर्व सोयीसुविधा देत असले तरी खेळाडूंसाठी अजूनही खेळात कारकीर्द घडवण्याचा मार्ग काही सोपा नाही. शहरातील धनुर्धर राष्ट्रीय विक्रमवीर व पदक विजेता तुषार प्रभाकर शेळके घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काहीवेळ विचारमग्न झाला होता. आर्थिक चणचणीमुळे त्
.
सध्या सोनिपत येथे तुषार धनुर्विद्या या खेळाचा सराव करत आहे. एका महिन्यात पुणे येथे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावर रुजू होईल. त्याच्यासारख्या गुणी अनुभवी खेळाडूमुळे राज्यातील खेळाडूंना निश्चितच फायदा होईल. राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही तुषारला मिळाला आहे, हे विशेष.
चार वर्षे घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासह आयटीबीपीत देशसेवा करण्यासाठी तुषारने वेळ दिला. अनेक आव्हानांना यशस्वीपणे परतावून लावत आयटीबीपीत आऊट ऑफ टर्न अशी पदोन्नतीही मिळवली. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून रुजू झाला. तेथेही त्याची कामगिरी उत्तम राहिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. राज्य शासनाने त्याला रोख पुरस्कारासह प्रथम श्रेणी पदावर नोकरी देण्याचीही घोषणा केली. रोख पुरस्कार व नोकरी मिळण्यास बराच वेळ गेला. रोख पुरस्कार एका वर्षाने तर नोकरी आता तीन वर्षांनी मिळाली आहे. उशिरा का होईना या खेळाडूला शासनाने नियुक्ती दिल्यामुळे युवा खेळाडूंना मार्गदर्शन व प्रेरणा निश्चितच मिळणार आहे.
तुषारने पुन्हा खेळाकडे परतावे म्हणून आई चित्रा आणि वडील प्रभाकर शेळके यांनी त्याला धीर दिला. सोबतच गुरुजन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, महाराष्ट्र यांनीही त्याला डगमगू नकोस खेळत राहा, यश मिळेल, असे मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा धनुष्य उचलले. त्यानंतर मागे वळून बघितले नाही. लक्ष्यावर अचूक तीर सोडत तुषारने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशाला गवसणी घालणे सुरूच ठेवले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खेळाकडे दुर्लक्ष ^घरची आर्थिक परिस्थिती सुधारणे माझ्यासाठी प्राधान्याची बाब होती. त्यासाठी ४ वर्षे खेळाकडे दुर्लक्ष केले. आयटीबीपीत पहिली नोकरी मिळाल्यानंतर मला नव्याने आत्मविश्वास मिळाला. म्हणून पुन्हा धनुर्विद्या या खेळाचा सराव सुरू केला. एकाच वर्षात अपेक्षित लक्ष्य गाठले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत देशातील अग्रणी धनुर्धरांना मागे टाकून संघात स्थान व स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. हे माझ्या कारकीर्दीला नवे वळण होते. -तुषार शेळके, आंतरराष्ट्रीय भारतीय धनुर्धर.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.