
Multimodal Corridor from Virar to Alibaug: विरारमार्गे थेट अलिबागला पोहोचता येणार आहे. राज्य सरकारने या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. इतंकच नव्हे तर ही मुंबई महानगरातील पहिल्या प्रवेश नियंत्रित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेची उभारणी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारण्यास ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांच्या आत या प्रकल्पाच्या ‘बीओटी‘ तत्त्वावरील कामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
एमएसआरडीसीने 96.5 किमी लांबीच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. तो वसईतील राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर येथून सुरू होईल. तर, पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बळवली गावादरम्यान हा मार्ग असेल. या मार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी 4 मार्गिका उभारल्या जाणार असून, मुंबई आणि दिल्ली एक्स्प्रेसवेचा काही भाग आणि हा महामार्ग एकत्रित जाणार आहे. या भागात रस्त्यावर प्रत्येकी एका दिशेच्या वाहतुकीसाठी 6 मार्गिकांचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील कोंडी कमी होईल. भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यावर 14,763 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीएला पोहोचता येणार आहे. मात्र, या महामार्गातील मोरबे ते करंजाडे हा 21 किमी लांबीचा मार्ग विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरसोबत एकत्र उभारला जाणार आहे. एमएसआरडीसी या 21 किमी मार्गाचे काम करणार आहे. मात्र, सध्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
अलिबाग-विरार मार्ग पुर्ण झाल्यानंतर विरारहून अलिबागचा प्रवास दीड ते दोन तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्याच्या काळात विरारहून अलिबागला पोहोचण्यासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागतो. 125 किमी लांबीच्या या मार्गासाठी सगळ्यात पहिलेड डीपीआर 2016मध्ये तयार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत बदललेल्या परिस्थितीनंतर डीपीआरमध्ये अनेक लहान मोठे बदल करण्यात आले.
FAQ
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजे काय?
ही मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित मार्गिका आहे, जी विरार ते अलिबाग या 96.5 किमी लांबीच्या मार्गावर उभारली जाणार आहे. हा रस्ता वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी डिझाइन केला आहे.
2) हा मार्ग कोठून कोठे जाणार आहे?
हा मार्ग वसईतील राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर येथून सुरू होईल आणि पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बळवली गावापर्यंत असेल.
3) या मार्गिकेची लांबी आणि रचना कशी असेल?
या मार्गाची लांबी 96.5 किमी आहे. यात दोन्ही बाजूंना प्रत्येकी 4 मार्गिका असतील, तर काही भागात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेसोबत एकत्रितपणे प्रत्येक दिशेला 6 मार्गिकांचा रस्ता उभारला जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.