
- Marathi News
- National
- MP Funds Decreased By 65% In 5 Years, UP Tops In Fund Receipts, Accounting Of Funds Released To MPs In 2019 24 Lok Sabha Session
नवी दिल्ली50 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
संसद सदस्यांना स्थानिक विकास योजनेअंतर्गत(एपीलॅड्स वा खासदार निधी) जारी होणाऱ्या निधीत घसरण नोंदली आहे.च १७ व्या लोकसभेदरम्यान(२०१९-२४) केंद्र सरकारने खासदार निधीअंतर्गत फक्त ४,५१० कोटी रुपये जारी केले आहेत. ही रक्कम मागील लोकसभेच्या तुलनेत ६५.२% कमी आहे. १६ व्या लोकसभेदरम्यान केंद्र सरकारने १२,९४५ कोटी रु. खासदार निधी योजनेअंतर्गत जारी केले होते. दुसरीकडे, निधी प्राप्त होण्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अव्वल आहेत. सर्वात कमी फंड दिल्ली, हरियाणा आणि पंजाब राज्यांना मिळाले.

खासदार निधी योजनेअंतर्गत खासदाराला वार्षिक ५ कोटी रु. मिळतात. या योजनेची सुरुवात १९९३ मध्ये झाली होती. योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा उपयोग आपल्या मतदारसंघातील विकास कामांवर केला जातो. २०१९-२४ दरम्यान निधी जारी करण्यात घसरण येण्याचे कारण कोरोना सांगण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.