
- Marathi News
- National
- 6600 Crore Crypto Scam; CBI Raids In Nanded, Pune, 180% Lure For ‘GainBitcoin’ In 18 Months
नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गेनबिटकाॅइनच्या ६,६०० कोटींच्या क्रिप्टो चलन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी नांदेड,पुणे,कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी छापे मारले. दरमहा १० टक्के असे १८ महिन्यात तब्बल १८० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून देशभरातील ८ हजार गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला होता. सीबीआयने मंगळवारी महाराष्ट्रातील तीन शहरांसोबतच दिल्ली एनसीआर, चंदीगड आणि बंगलुरू येथे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींच्या निवासस्थान,मालमत्ता आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. गेनबिटकाॅइन डाॅट काॅम या वेबसाइटच्या माध्यमातून ही गंुतवणूक घेतली जात होती. याचा मास्टरमाइंड अमित भारद्वाज याचा मृत्यू झाला आहे.
सन २०१५ मध्ये व्हेरिएबलटेक प्रा.लि.कंपनीच्या नावाखाली लाँच करण्यात आली.त्यासाठी मल्टी लेव्हल मार्केटिंगची (साखळी) पद्धत अवलंबण्यात आली होती. म्हणजे गुंतवणूकदारांनी आपल्या नवे गंुतवणूकदार शोधायचा व साखळी जेवढी वाढेल त्यानुसार त्यांना पैसे मिळणार होते. गुंतवणूकादरांना सुरुवातीला पैसेही मिळाले, परंतु २०१७ मध्ये गुंतवणुकींचा ओघ कमी होताच योजना गोत्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रापासून ते जम्मू-काश्मीर आणि दिल्ली ते पश्चिम बंगाल असे देशभरात गुुन्हे दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. बिटकॉइनमध्ये परतावा गुंतवणूकादारांनी ‘क्लाऊड माइनिंग’चा करार केल्यानंतर त्यांनी बाहेरच्या एक्सचेंजमधून बिटकॉइऩ चलन खरेदी करायचे. ते गेनबिटकॉइनमध्ये जमा करायचे. त्यावर दरमहा १० टक्के परतावा बिटकॉइनच्या रुपाने देण्यात येणार होता. ही योजना १८ महिन्यांची होती. परंतु योजनेत तोटा होताच गेनबिटकॉइने सर्व पे-आऊट स्वत:च्याच ‘एमकॅप’ नावाचे कथित क्रिप्टो चलनात वळवले. त्याचे मूल्य बिटकाॅइनच्या तुलनेत अगदीच नगण्य होते. २०१७ मध्ये दुबईत पळाला, २०१८ मध्ये अटक : कंपनी तोट्यात जाताच तो दुबईत पळाला. त्याने अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग,ब्रिटीश व्हर्जिन आयलंड,इस्टोनिया,दुबईतही कंपन्या स्थापन केल्या होत्या. मार्च २०१८ मध्ये त्याला बँकाॅकमध्ये अटक करुन पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आले. १५ जानेवारी २०२२ मध्ये हदयविकाराने त्याचा मृत्यू झाला.
गेनबिटकॉइनचे पुणे कनेक्शन
गेनबिटकॉइनच्या योजनेत पुण्याचे आकाश संचेती, काजल शिंगवी,व्यास नरहरी सपा हे आरोपी आहेत.त्यापैकी संचेती आणि व्यास हे दोघे प्रमुख होते. त्याशिवाय भारव्दाजचे वडील महेंद्र कुमार आणि भाऊ अजय हे सुद्धा यात सहभागी होते.
मास्टरमाइंड अमित भारद्वाज
गेनबिटकॉइन घोटाळ्याचा मास्टरमाइंड दिवंगत इंजिनिअर अमित भारद्वाज इन्फोसिसमध्ये नोकरी करायचा. नंतर त्याने नोकरी सोडली. क्रिप्टो चलनावर त्याने तीन पुस्तकेही लिहीली आहेत. आधी त्याने जीबीमायनर्स ही कंपनी स्थापन केली. २०१५ मध्ये गेनबिटकॉइन कंपनी स्थापन केली.
सन २०१८ मध्ये एका बिटकाॅइनची किंमत सुमारे २.६० लाख रुपये होती. त्यावेळी भारद्वाजच्या कंपनीकडे सुमारे २,१३५ कोटी रुपयांचे बिटकाॅइन होते. सध्या एका बिटकाॅइनची किंमत सुमारे ७६ लाख ७६ हजार ८४७ रुपये आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.