digital products downloads

78 वर्षांत मुस्लिम लोकसंख्या 3 कोटींहून 30 कोटींवर: त्यांची संख्या वाढली तर काय होते, हे आपण बांगलादेशात पाहिले – शरद पोंक्षे – Mumbai News

78 वर्षांत मुस्लिम लोकसंख्या 3 कोटींहून 30 कोटींवर:  त्यांची संख्या वाढली तर काय होते, हे आपण बांगलादेशात पाहिले – शरद पोंक्षे – Mumbai News


माझ्या वाचनात आले की 1947 साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने इथे राहिले ते तीन कोटी होते. 78 वर्षात ते 30 कोटी झाले. जवळपास 10 टक्क्यांनी वाढले. त्यांची जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काय होते? आता काही महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये पाहिले ना ते घडते.

.

शरद पोंक्षे म्हणाले की, मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये येणारे लोंढे थांबवण्याची गरज आहे, नाहीतर मुंबई कधीतरी फुटेल. वाढणारी लोकसंख्या थांबली पाहिजे. भारतामध्ये येणारे लोंढे थांबले पाहिजे. बाहेरून कोण येत आहे. 78 वर्षांमध्ये 3 ते 30 कोटी मुसलमान होतात. हिंदूची टक्केवारी कमी होते. पाकिस्तानमध्ये 15 टक्के असणारा हिंदू 1 टक्यावर येतो. कुठेतरी यावर राजकीय नेत्याने विचार केला पाहिजे. सत्ताधारी अन् विरोधकांनी यावर विचार करत हे थांबवले पाहिजे. भारत वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

वाढायला जागा राहिली नाही

शरद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई वाढायला जागा राहिली नाही. कारण चारही बाजूने समुद्र आहे. 1994-95 मध्ये बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की, आता मुंबईमध्ये येणारे लोंढे थांबवले पाहिजे. आता कुणाला मुंबईमध्ये घेऊ नका, कारण एक दिवस ही मुंबई फुटेल.आमच्या पिढीने शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या बांधकामाचा सर्वाधिक त्रास सहन केला असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

नेमके पोंक्षे काय म्हणाले?

शरद पोंक्षे म्हणाले की, जवळजवळ गेली 50 वर्षे मी मुंबईत राहतोय. या 50 वर्षांमध्ये बदलत गेलेली मुंबई मला पाहायला मिळाली. आमच्या पिढीने शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या बांधकामाचा (रस्ते, पुल ) सर्वाधिक त्रास सहन केला आहे. आमच्या अख्या आयुष्यात कुठेना कुठेतरी काहीना काही बांधकाम सुरू होते. त्यामुळे ट्रॅफिक आणि या सगळ्यांमध्ये आमचं आयुष्य गेले. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. शहरांचा, देशाचा जर व्हायला हवा असेल तर मग त्रास सहन करायला पाहिजे.

बाळासाहेबांचे वाक्य आठवते

शरद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, पण हे सगळं काही होत असताना मला दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य आठवते. मी त्यांचा फॉलोवर होतो. शिवाजर पार्कमध्ये होणाऱ्या त्यांच्या प्रत्येक भाषणाला मी जात होता. 1994-95 च्या काळातील एका भाषणामध्ये ते असे म्हणाले होते की मुंबई मध्ये येणारे लोंढे आता थांबवायला पाहिजे. हे काही तरी 94-95 साली बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. 94-95 नंतर येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये आता घेऊ नका, कारण एक दिवस ही मुंबई फुटेल.

टॉवरमधून बघताना भीती वाटते

शरद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, मुळात ब्रिटिशांनी सात बेटे एकमेकांमध्ये भरती करून त्याला मुंबई नावाचं शहर बनवले गेले मोठे आणि नंतर मग बांद्रापर्यंत ते वाढले आणि आता उपनगरे वाढत वाढत ते पार पालघरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आणि दुसरीकडे पार डोंबिवली आणि बदलापूर इथपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सगळ्या बेटांच्या मध्ये भराव घालून ही मुंबई मोठी केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जे टॉवर्स उभे राहतात ते टॉवर्स बघून भयानक भीती वाटते.

अंडरग्राउंड मेट्रोपासून काही अंतरावर समुद्राचे पाणी

शरद पोंक्षे म्हणाले की, सगळ्यात मोठा उपाय आहे तो या शहरांमध्ये येणारे लोंढे थांबवणं. हा त्याच्यावरचा उपाय आहे. शेवटी प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची, प्रत्येक देशाची संसाधन पुरवण्याची क्षमता असते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होत की, 1995 आधीच्या झोडप्या नक्की करा, त्याच्यानंतर आता एकही झोपडी होऊ देऊ नका. वांद्रे ते नरिमन पॉइंटपर्यंत संपूर्ण अंडरग्राउंड मेट्रो झाली आहे. मला भीती वाटते काही अंतरावर समुद्राचे पाणी आहे. तो काला पत्थर सिनेमा आठवतो मला कुदळ मारता मारता एक एक थेंब यायला सुरुवात झाली आणि काय झाले त्या सिनेमांमध्ये बघितले ना. कधीतरी या मुंबईचे असे काहीतरी होऊ शकते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp