
इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने प्रकल्पाचा ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी (Alignment) सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर
.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावे. हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाने ५०% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे-नाशिक या २३६ कि. लांबीच्या नवीन सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती करून आर्थिक सहभाग देण्यास शासन निर्णय क्र. आरएलवाय -०२१२/१८०/प्र. क्र. ३७/ परिवहन-५ दि. १५.०४.२०२१ अन्वये मान्यता देण्यात आली होती. सदर प्रकल्प र १६०३९ कोटी (आत्ता ₹ २५००० कोटी) एवढ्या एकूण प्रकल्प खर्च रकमेच्या मर्यादेत ६०% कर्ज आणि ४०% समाभागमुल्य या प्रमाणात राबवण्यास मान्यता देण्यात आली.
मात्र, डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात होते जिथे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र (एनसीआरए), पुणे यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापित केली आहे. जीएमआरटी वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून प्रस्तावित रेल्वे मार्गाचा जात असल्याने मा. रेल्वे मंत्री यांनी दि. १८.१२.२०२४ रोजी सदर पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० कि. वळसा घालून करण्यात आला. तसेच सदर रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ऐवजी मध्य रेल्वे मार्फत करण्याचे रेल्वे मंत्री यांनी जाहीर केले. सदर संरेखन कुठल्याही परिस्थितीत पुणे नाशिक थेट रेल्वे मार्गास अनुसरून नाही ज्याचा सर्वाधिक फटका पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला देखील बसणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्र सरकारने इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत नाशिक वाढवण पोर्ट रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे (FLS) नुकताच मंजूर केला आहे. पुणे नाशिक थेट रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कंटेनर मालवाहतूक मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला बायपास करून थेट नाशिक मार्गे वाढवण बंदराला जोडेल ज्यामुळे राज्याला शाश्वत पर्याय उपलब्ध असेल. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती केल्यास रेल्वे नियमांचे पालन करीत प्रकल्पाचे नियोजन आणि अमंलबजावणी करण्याची संपूर्ण जवाबदारी राज्य शासन महारेल कडे सोपवू शकते ज्याचा सर्वाधिक फायदा पुणे नाशिक औद्योगिक पट्टयाला मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत निर्यातक्षम कंटेनर मालवाहतूक रेल्वेने वाढवण बंदराला पाठवण्यासाठी राज्याला शाश्वत पर्याय उपलब्ध करेल. त्यामुळे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी (Alignment) सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.