
ठाणे जिल्ह्यात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून डायघर येथे वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प सुरू झाला नसून या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आ
.
या संदर्भात राजू पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडी तरी लाज शरम असेल तर… असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
यासंदर्भात हा प्रकल्प यशस्वी होणार नाही, हे सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र तरी देखील नियम न पाळता हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची टीका राजू पाटील यांनी केली आहे. तितकेच नाही तर ठाण्याच्या साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर दुकानांचे अतिक्रमण लगेच काढले जाते. मग आता परिसरातील नागरिकांचे दुःख यांना दिसत नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
राजू पाटील यांनी केलेली पोस्ट देखील पहा….
ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर त्या दुकानदारांचे अतिक्रमण लगेच तोडले ….मग आता डायघर परिसरातील नागरिकांचे दु:ख ह्यांना दिसत नाही का? ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघर मध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं कि तुमचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. या प्रकल्पाला सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियम इथे पाळले जात नव्हते. शेवटी कचऱ्यापासून वीज निर्मिती नव्हे तर ह्यांनी दुर्गंधीची निर्मिती केली व आता तर भयंकर वायुप्रदुषण पण होत आहे. या संदर्भात सातत्याने ग्रामस्थांसोबत संघर्ष केला आणि ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरिकांना गृहीत धरायला घेतलं आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते नागरिकांच्या घरांमध्ये धूर गेलाय. मुख्यमंत्री पद भूषविल्या नंतरही हा ठाण्याच्या कचऱ्याचा प्रश्न हे बापबेटे सोडवू शकले नाहीत ही अत्यंत लिजीरवाणी गोष्ट आहे…अर्थात कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडीतरी लाज-शरम उरली असेल तर ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.