
अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या युवा भूषण स्पर्धा २०२५ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या अक्सा मिर्झाने बाजी मारली आहे. या स्पर्धेत एकूण १,६९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत २९ विद्यार्थी पोहोचले. या फेरीत २०० गुणांची लेखी परीक्षा, गटचर्चा, मुलाखत आणि ५० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. परीक्षक सचिन वाकुडकर, प्रा. सोनटक्के आणि ऋषभ राऊत यांच्या निर्णयानुसार अक्सा मिर्झाला प्रथम क्रमांक मिळाला.
विजेत्या अक्सा मिर्झाला १० हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या काजल जावरकरला मिळाला. तिला ७ हजार रुपये मिळाले. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरचे विकास सुटे तृतीय क्रमांकावर राहिले आणि त्यांना ५ हजार रुपये मिळाले.
शिवाजी महाविद्यालय अमरावतीची गायत्री सरदार आणि धनवटे नॅशनल कॉलेजची स्नेहा गजघाटे यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एल कुलट आणि संस्थेचे शिक्षण संचालक पंडित पंडागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. डॉ. रूपाली टोणे यांनी शारीरिक क्षमता चाचणीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विश्वास जाधव आणि डॉ. स्वप्नील अरसड यांनीही या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.