
भारतीय जनता पक्षाचा पुणे येथील कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या वेळी मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही
.
या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण पोलिस आयुक्तांना दिल्या असल्याचे सांगितले आहे. याविषयी आपल्या पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो. देवेंद्र कडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्र सारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबत ही पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत.’
नेमके प्रकरण काय?
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मिडीयाचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारे आरोपी नुकतेच एका प्रकरणात जामिनावर सुटेल आहेत. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीला मारहाण केल्याने आता सामान्य व्यक्तीच्या सुरक्षेचे काय असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. तर गृहमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नाही असा टोला ही काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी लगावला होता.

तिघांना अटक एक जण फरार
शिवजयंतीच्या दिवशी हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वादातून मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारणे टोळीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ कॉल करुन जखमीची चौकशी केली होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार झाला आहे. गेली अनेक दिवस पुणे शहरात वाहन तोडाफोडीच्या घटनेसह कोयता गँगची दहशत दिसून येत आहे. यात आत केंद्रीय मंत्र्यांसह काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याने कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.