
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आ
.
येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता नाशिकच्या निफाडमधील ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे निफाडमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा बसणार असल्याचे दिसून येत आहे. अनिल कदम कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. यावरून अनिक कदम यांनीही स्पष्टीकरण दिले.
अनिल कदमांकडून पक्ष प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन मी माझ्या प्रशासकीय कामानिमित्त मुंबई येथे आलो आहे. माझा कुठलाही पक्ष प्रवेश नसून, काही प्रसार माद्यमातून चुकीची बातमी पसरवली जात आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे सांगत माजी आमदार अनिल कदम यांनी भाजप प्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
कोण आहेत अनिल कदम?
अनिल कदम हे 2009 आणि 2014 मध्ये सलग दोनवेळा निफाड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. अनिल कदम यांना शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनिल कदम हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. निफाड तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. परंतु, अनिल कदम यांना त्यांच्या घरातूनच आव्हान आहे. चुलत बंधू यतीन कदम हे त्यांचे विरोधक मानले जातात.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनिल कदम महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी अनिल कदमांचा पराभव केला. 2009 साली शिवसेनेच्या अनिल कदमांना 90 हजार 65 मते तर राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना 56 हजार 920 मते पडली होती. 2014 मध्येही कदम आणि बनकर यांच्यात थेट लढत झाली. त्यावेळी अनिल कदमांना 78 हजार 186 मते, तर दिलीप बनकर यांना 74 हजार 265 मते मिळाली. या निवडणुकीत बनकर यांना केवळ 3 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, 2019 च्या निवडणुकीत दिलीप बनकरांना 96 हजार 354 मते, तर अनिल कदमांना 78 हजार 686 मते पडली होती. या निवडणुकीतही अनिल कदम यांना पराभव स्वीकारावा लागला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.