
छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर शंभुराजेंचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर अन् समाधीस्थळ वढु बुद्रुकमध्ये भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अर्थमंत्र्
.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी 50 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. यासोबतच लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचे यथायोग्य स्मारक
अजित पवार म्हणाले की, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.
शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटीचा वाढीव निधी
अजित पवार म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आग्र्यामध्ये भव्य स्मारक उभारणार
अजित पवार म्हणाले की, मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. तिथेही आमचे मुख्यमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील.
3 ठिकाणी शंभुराजेंचे भव्य स्मारक
अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.