digital products downloads

मसान होळीची राख… दिवाळीनंतर चितांमधून उचलतात भस्म: 4 महिने उन्हात सुकवून नकारात्मक ऊर्जा मिटवतात, जेथे लोक घाबरत होते, वाराणसीत आज तेथेच मसान होळी

मसान होळीची राख… दिवाळीनंतर चितांमधून उचलतात भस्म:  4 महिने उन्हात सुकवून नकारात्मक ऊर्जा मिटवतात, जेथे लोक घाबरत होते, वाराणसीत आज तेथेच मसान होळी

  • Marathi News
  • National
  • Ashes Of Masan Holi… After Diwali, Ashes Are Collected From The Pyres, Dried In The Sun For 4 Months To Eliminate Negative Energy, Where People Were Afraid, Today Masan Holi Is Held In Varanasi

चंदन पांडेय | वाराणसी2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बाबा विश्वनाथाची नगरी काशीत होळीची सुरू झाली आहे. रंगभरी एकादशी म्हणजे, सोमवारी बाबा भाेलेनाथ माता गौराचे गौना(विवाहानंतरचा विधी) करून आपल्या धामात आणले. दुसऱ्या दिवशी महास्मशानभूमी मणिकर्णिका घाटावर मसान होळी खेळली जाईल. जळत्या चितेदरम्यान शहनाईचा मंगल ध्वनी वाजवला जाईल.

यानंतर चितांतील थंड राखेने होळी खेळली जाईल. बाबा दुपारच्या माध्यान्हात स्नान करण्यासाठी मणिकर्णिका घाटावर येतात,अशी मान्यता आहे. यानंतर ते प्रियगणांसोबत भस्म होळी खेळतात. मंगळवारी दुपारी १२ ते २ दरम्यान ही होळी असेल. भस्मात नकारात्मक ऊर्जा असते,त्यामुळे होळी खेळण्याआधी भस्म शुद्धीकरण केले जाते.ही प्रक्रिया ४ महिने आधी सुरू होते. महास्मशान नाथ मंदिराचे व्यवस्थापक गुलशन कपूर यांच्यानुसार, ही प्रक्रिया दीपावलीनंतर अघोर चतुर्दशीच्या आरतीनंतर सुरू करतात.

रात्री ज्या चिता थंड होतात,त्यातील राख पातळ कपड्यावर टाकतात. त्यावर गंगाजल शिंपडले जाते. सूर्यप्रकाशात नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी म्हणून, राख पोत्यात भरून ती छतावर ठेवतात. ही प्रक्रिया चार महिने चालते. हरिश्चंद्र घाट स्थित अघोर पीठाचे पीठाधीश्वर कपाली बाबा म्हणाले, अघोर चतुर्दशीला महादेवाने दक्षिणमुखी अघोर स्वरूप धारण केले होते. यामुळे अघोर चतुदर्शीच्या मध्यरात्री योगिनी चक्र पूजनानंतर चिता भस्म जमा करणे सुरू होते.

दुर्गा सप्तशती अन् शिव पुराणात याचा उल्लेख

कपूर यांच्यानुसार, मसान होळीचा उल्लेख दुर्गा सप्तशतीतील एक श्लोक व शिवपुराणमध्येही आढळतो. ही नवी परंपरा आहे. घाटाच्या किनाऱ्यावरील बाबा मसाननाथ मंदिरात ८० आणि ९० च्या दशकातही चिता भस्माची होळी साजरी होत होती. त्या काळात लोक घाटाच्या किनाऱ्यावर जायला धजावत नव्हते आणि स्मशानभूमीला चांगले मानत नव्हते. यामुळे ही होळी प्रचलित नव्हती. हळूहळू लोक जागरूक झाले व आता हा वविख्यात पर्व झाला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp