
Chhatrapati Shivaji Maharaj University : शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा यासाठी आज कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. लवकरात लवकर विद्यापीठाचं नाव बदलण्याची मगणी करण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळतंय.
राज्यभरात शिवजयंतीचा उत्सव सुरु असतानाच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा पुढे आला आहे. विद्यापीठाच्या नावातील शिवाजी हा एकेरी उल्लेख काढून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र समन्वय समितीनं मोर्चा काढला आहे. एकेरी नावाच्या अनेक संस्था, स्थळ आणि रस्त्यांची नाव बदलण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा तापला
– 1962 साली कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना
– स्थापनेवेळीच विद्यापीठाला शिवाजी महाराजांचं नाव
– विद्यापीठाला मोठं नाव न ठेवण्यामागे अनेक कारणं
– शॉर्टफॉर्म उच्चारताना मूळ नाव गायब होऊ नये यासाठी छोटं नाव
– तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची नावाला मान्यता
नामविस्ताराला अनेक संघटनांचा तीव्र विरोध
विधानसभेतही शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा मांडला गेला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे. तर शिवाजी महाराज यांच्या नावावरून वाद करू नये असा सल्ला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरत असतानाच दुसऱ्या बाजूला या नामविस्ताराला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. विद्यापिठीच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तर ‘माझे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असे हॅशटॅगही सोशल मीडियावर वापरले जात आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.