
मुंबई2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे २०२० मध्ये निधन झाले. सुमारे 4 वर्षे आणि 4 महिन्यांनंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली आहे. सीबीआयच्या तपासानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.
रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नव्हते. पण 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत सापडला होता. करीयर यशाच्या शिखरावर असताना त्याने स्वतःला संपवल्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगलही समोर आला. सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात तिला मुख्य आरोपी मानले जात होते. तिला एक महिना भायखळा तुरुंगात देखील जावे लागले होते.
या प्रकरणात, सीबीआयने 6 ऑगस्ट 2020 रोजी एफआयआर नोंदवला होता, आता 4 वर्षे 6 महिने आणि 15 दिवसांनंतर, सीबीआयने अंतिम क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. सीबीआयने दोन प्रकरणांची चौकशी केली होती…
- सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.
- रिया चक्रवर्तींची तक्रार, ज्यामध्ये तिने सुशांतच्या कुटुंबावर मानसिक छळाचा आरोप केला होता.
2020 मध्ये फ्लॅटमध्ये सापडला होता मृतदेह
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. पहिल्या दृष्टीक्षेपात हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते. यानंतर मीडिया आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्युचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्युच्या काही दिवसांपूर्वी 8 जून रोजी त्याची मॅनेजर दिशा सालियन हिचा मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू संशयास्पद होता. मात्र, आजपर्यंत यावर कोणताही खुलासा होऊ शकला नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited