
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर १ एप्रिलपासून पथकर (टोल) वाढीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकर वाढीचा निर्णय घेतला असून प्रतिकिमीनुसार दरवाढ होणार आहे. पथकरात १९ टक्यांच
.
त्यामुळे १ एप्रिल २०२५ पासून संपूर्ण ७०१ किमीच्या प्रवासासाठी चारचाकी वाहनांसाठी एकेरी टोल १,२५० रुपये आहे. आता १,४५० रुपये इतका भरावा लागणार आहे. मुंबई ते नागपूर एक्स्प्रेस वे या ७०१ किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. महिनाभरात इगतपुरी ते आमने हा ७६ किमीचा मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर नवे टोलदर लागू होणार असून पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत हे दर लागू राहतील.
नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी टोल वाहनांचा प्रकार सध्याचे दर नवीन दर कार, हलकी मोटार १०८० रू १२९० हलकी व्यावसायिक मिनीबस १७४५ रू २०७५ बस अथवा छोटा ट्रक ३६५५ रू ४३५५ तीन आसांचा व्यावसायिक वाहन ३९९० ४७५० अवजड बांधकाम साहित्य ५७४० रू ६८३० अति अवजड वाहने ६९८० रू ८३१५
‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ व ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड’ या कंपनीने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये समृध्दी महामार्गावरील टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रति किलो मीटर १.७३ रूपये टोल आकारला जात होता. आता १ एप्रिलपासून २.०६ रुपये प्रति किमी होणार आहे. त्यानुसार ६२५ किलोमीटरच्या प्रवासासाठी पथकरात १७५ रुपयांची वाढ असेल. मात्र संपूर्ण ७०१ किलोमीटर प्रवासाचा विचार केल्यास त्यासाठी सध्याच्या पथकरापेक्षा त्यांना १९७ रुपयांचा कर अधिक द्यावा लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.