
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांची आज जळगावमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. सध्या लाडक्या बहिणी सरपंच आहेत, नवऱ्यांना माझी विनंती आहे की गावच्या कारभारात डोकावू नका, महिलांना थोडे काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे राहा, तुमचे काम
.
सरपंच किती काम करतो, हे पोस्टरवर नव्हे जमीनीवर दिसला पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. काही लोक बॅनर लावतात कार्य सम्राट, भावी आमदार वगैरे -वगैरे पण त्याच्या गावातील गटार ओसांडून वाहत असेत तरी देखील त्याचे लक्ष नसते, वा रे वा सरपंच असा टोलाही त्यांनी लगावला. पोस्टरबाजी करण्यापेक्षा 50 टक्के तरी त्या गावात प्रत्यक्षात तेथील सरपंचाचे काम असले पाहिजे. पाणी पिऊन पिऊन लोक शिव्या देतात, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
आमदार होणे सोपे, सरपंच होणे एवढे सोपे नाही
आमदार होणे सोप आहे. पण सरपंच होण एवढे सोप नाही. आमदाराचे कसे असते, या गावात मत भेटले नाही तर त्या गावात भेटते. पण सरपंचांचे तसे नाही, मेरे बाप को उसके बापने गिराया था असे असते, चुन चुन के बदला लेगे, शेत विकून टाकेल पण त्याला पाडूनच टाकेल, अशी मानसिकता सरपंचपदाच्या निवडणुकीत असते. मी भरपूर असे सरपंच पाहिले की, त्यांनी गावासाठी खूप कामे केली, मात्र पुढच्या वेळी विचारले काय झाले? तर ते सांगतात, संपूर्ण पॅनल पडले. मला वाटते ग्रामपातळीवर सुध्दा सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे, जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता सर्वांमध्ये झाली पाहिजे, त्याशिवाय विकासाचे हे पर्व चालू शकत नाही, असेही पाटील म्हणाले.
1 हजार लोकांमधून 600 मते घेणे अवघड
ग्रामपंचायत निवडणूक जो जिंकतो तो महामंडलेश्वर असतो. 4 लाख लोकांमधून निवडून येणे सोपे आहे, पण 1 हजार लोकांमधून 600 मते घेणे देखील अवघड आहे. सरपंच आणि विरोधक एकाच टपरीवर चहा पिले म्हणजे गावाचे कल्याण झाले असे समजा, त्यामुळे विरोधकांना पटवा, असे गुलाबराव पाटील म्हणाले. ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक एकाच मोटारसायकलवर फिरताना दिसला, समजा ती ग्रामपंचायत पहिली आली, शेवटी चार कामांमध्ये फिफ्टी फिफ्टी होणारच. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांना माझी विनंती आहे, की सरपंच निवडून आलो तरी मी गावाचा आहे आणि पडलो तरी मी गावाचा आहे, अशा ग्रामपंचायतींचा 100 टक्के विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.