
Maharashtra Gondia-Balharshah Railway Line: देशातील रेल्वे वाहतूक अधिक गतिमान करण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाने केंद्र सरकार रेल्वेसेवेच्या विकासाचे अनेक प्रकल्प राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्राच्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत देशाच्या विविध भागातील रेल्वेसेवेचा दर्जा उंचावणारे सुमारे 18 हजार 658 कोटी रुपये खर्चाचे चार नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील गोंदिया-बल्लारशा या 240 किलोमीटर रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणासाठी 4811 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या कार्यवाही काळात तीन कोटी 79 लाख मनुष्य दिवसांची रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्रातील गोंदिया-बल्लारशा रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाचा यामध्ये समावेश झाल्याने राज्याच्या दळणवळण क्षेत्राला नवी गती प्राप्त होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील गोंदिया – बल्हारशाह डबलिंगसह, संबलपूर – जरापडा तिसरी आणि चौथी लाईन, झारसुगुडा – सासन तिसरी आणि चौथी लाईन आणि खरसिया – नया रायपूर – परमलकसा पाचवी आणि सहावी लाईन या 4 प्रकल्पांचा समावेश आहे.
गोंदिया बल्लारशाह रेल्वे दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील मिळाला. 240 किलोमीटर रेल्वे मार्ग दुहेरीकरण होणार आहे. विदर्भाच्या विकासाला दुहेरीकरणामुळं बुस्टर मिळणार आहे. गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. 240 किमी मार्ग असेल. यात 29 स्टेशन, 36 ब्रीज, 338 लहान ब्रीज, 67 रेल्वे अंडर ब्रीजेस असतील. मराठवाडा विदर्भ भागात आर्थिक विकास वेगात होईल. तसेच 62 कोटी किलोग्राम दर वर्षी कार्बन डाय ॲाक्साईड वाचेल. जे अडीच कोटी झाडे लावल्या सारखं आहे.
पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत होणाऱ्या या नव्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार. विकासाच्या या वाटचालीत महाराष्ट्र सदैव केंद्र सरकारच्या सोबत राहील. मागासलेपणातून विकसितपणाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात नवी रेल्वे स्थानके उभारण्यास मंजुरी देऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीस वेग दिला आहे असं ट्विस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.