
Deenanath Mangeshkar Hospital: भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पैशाअभावी उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करण्यात येतोय. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयाकडून खुलासा करण्यात आला होता. पण तरीही रुग्णालय टिकेचे धनी होतच होते. दरम्यान आता मंगेशकर रुग्णालयला उपरती झाल्याचे दिसून येत आहे. कारण तसा खुलासा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून देण्यात आलाय.
पत्रात काय म्हटलंय?
कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली. काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली.काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली. हे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे. या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली..
लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला हे सोडून आम्ही आत्मचिंतन केले. झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले. तरीसुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासात आहोत.सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले. मात्र तरीसुद्धा ते कोणालाही न सांगता निघून गेले. दीनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा पुन्हा तेही रूपातील अनामक रक्कम घेतली जात नसेल. मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम देण्यास सुरुवात झाली. कालच्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला.
इथून पुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून मग तो इमर्जन्सी रूममधून आलेला असतो पण डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो. लहान मुलांच्या विभागाला आलेला असो, त्याच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही, असा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी केला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होईल झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत, असं पत्रात म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना रक्तस्त्राव होत होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी भिसे कुटुंबियांकडून 20 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती दिली. दहा लाख रुपये भरले तरच उपचार केला जाईल असं थेट रुग्णालयाकडूनच सांगण्यात आलं. ज्यावर कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये भरतो, असं सांगितलं. मात्र रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी ते मान्य न केल्यानं नाईलाजास्तव भिसे कुटुंबीयांना तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावं लागलं. यादरम्यान त्यांचा रक्तस्त्राव वाढला. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन मुलींना जन्म दिला मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यातल्या रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असं गोरखे यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.