
गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात सुरु असलेल्या आंदोलनावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. मराठीसाठी आम्हीही आंदोलने केली आहेत. पण मनसेच्या आंदोलनाला आम्ही मराठीचे आंदोलन म्हणणार नाही, असे संजय रा
.
संजय राऊत म्हणाले, आंदोलनाची राजकारणाची जी काही परंपरा आहे, त्यानुसार त्यांनी काम केले. आमच्या त्यांच्या राजकारणाला शुभेच्छा आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. त्यांच राजकारण आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण ज्या प्रकारचे आंदोलन मराठीविषयी मी पाहत होतो, त्याला मी मराठीचे आंदोलन म्हणणार नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा मराठी भाषेसाठी आंदोलने केलेली आहेत. मराठीसाठी आम्हीही लोकांच्या कानफडात मारलेल्या आहेत. बँकांमध्ये, सरकारी आस्थापणांमध्ये, एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालू केले. अनेक तज्ज्ञ आणून शिवसेना भवनमध्ये क्लासेस चालवून मुलांची मानसिक तयारी केली. एवढी तयारी करून सुद्धा ती मुले नोकरीत आली नाहीत, काही गडबड दिसली, तर आम्ही आंदोलने केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, हे मान्य केले पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचे असेल, तर त्यांची त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
मारामाऱ्या आम्हीही खूप केल्या. यापुढेही करत राहू. पण मराठीच्या आंदोलनाला अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते, ती आम्ही दिली. म्हणून आम्ही हजारो मुले बँकेमध्ये नोकरीत लावली. मराठी भाषेचा आग्रह धरून आम्ही बँकांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषा करायला लावली. साहित्यिक, सांस्कृतिक, मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात, ते आमच्यामुळे होतात. आम्ही त्यासाठी कुणालाही कानफटात मारली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
दुर्बलांवर हात टाकून चालत नाही, प्रमुखाला कानफाडले पाहिजे
दुर्बलांवर हात टाकून चालत नाही. मराठी भरती करत नाही, म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला मारले नाही. आम्ही एअर इंडियाचा सीएमडी कॅप्टन नंदाच्या कानफटात मारली होती. जो प्रमुख आहे, ज्याच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्याच्या कानफटात मारली पाहिजे. वॉचमन, शिपाई, चहा देणारा अशा लोकांना मारून आंदोलन होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मनसेचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी कुठले आंदोलन केले? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. फडणवीसांना या राज्यात गोंधळच घालायचा आहे.
भाजप समर्थित असल्याने रुग्णालयावर कारवाई नाही
संजय राऊत म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात काही लोकांनी आंदोलन केले. त्यावर हे लोक शोबाजी करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत आहेत. इतके भंपक राज्य या महाराष्ट्रात कधी आले नव्हते. आरएसएसचे लोक त्या रुग्णालयात काम करतात म्हणून मुख्यमंत्री असे म्हणतात. रुग्णालयाची सगळी बॉडी भाजप समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी एक दर्जा लागतो, तो देवेंद्र फडणवीस यांचा नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिंदे गटाकडून ओवैसींना ठाण्यात येण्याचे आमंत्रण
संजय राऊत यांनी ट्विटरवर एकनाथ शिंदे यांचे एक खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर चर्चा करत असताना एक व्हिडिओ ट्विट केला. याबाबत त्यांना विचारले असता राऊत यांनी एसंशि पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळल्याचे म्हणाले. हेच दुसऱ्या कोणाचा खासदार असता, तर हिंदुत्व वगैरे फार धोक्यात आले असते. हिंदुत्व कसे धोक्यात आले, याबाबत एसंशि, देवेंद्र फडणवीस बोलले असते, अशी टीका राऊत यांनी केली. माझ्या माहितीप्रमाणे एसंशि पक्षाच्या खासदाराने ओवैसी यांना ठाण्यात यायचे आमंत्रण दिले. एसंशि पक्षाला असदुद्दीन ओवैसी यांचा टेंभी नाक्यावर सत्कार करायचा आहे, असा टोलाही राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.