
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार धनंजय मुंडे सक्रीय राजकारणापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असताना देखील धनंजय मुंडे अनुपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले होते. अशात आता धनंजय मुंडेंना अर्धा
.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही दाखल करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते विधिमंडळाच्या अधिवेशनात तसेच सार्वजनिक कार्यक्रमात कुठेही दिसले नाहीत. अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही ते प्रकृतीचे कारण देत मुंबईत होते. त्यात आता धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. या संदर्भातील वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.
नेमके काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
बीडमधील पिंपळनेर येथे गुरुवारी भगवान गडाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस एकत्र दिसणार होते. पण ऐनवेळी धनंजय मुंडे यांचा दौरा रद्द झाला. यावरून विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता, धनंजय मुंडेंची तब्येत ठीक नाही, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असून डोळे देखील वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नाही, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच, आमच्या मिटिंगला ते मुंबईत येतात ना. काही कार्यक्रमांना ते हजेरी लावतात, जवळच्या व्यक्तींना आग्रह केल्यानंतर त्या कार्यक्रमांना ते जातात, असेही सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धनंजय मुडेंनी प्रकृतीच्या कारणास्तव काही वेळ विश्रांती घेतल्याचे सांगितले होते. तर, काही दिवसांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर डोळ्याच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया देखील झाली होती. तेव्हापासून ते माध्यमांपासून व सार्वजनिक कार्यक्रमातून दूर आहेत.
धनंजय मुंडेंच्या गालावरून वारे गेले – नामदेव शास्त्री
दरम्यान, बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. यावेळी आयोजित समारंभात बोलताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारे गेले. त्यामुळे एक चांगली वाणी बंद पडली. ही वाणी पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले होते. तसेच आज ते आले नाही. पण त्यांच्यासाठी आपण मोठा कार्यक्रम करू, असेही नामदेव शास्त्री म्हणाले होतेह
हे ही वाचा…
धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात:रणजित कासलेंनी EVM संबंधी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जाणार कोर्टात
निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेने परळी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला धनंजय मुंडे यांच्या माणसाने आपल्या खात्यावर 10 लाख रुपये टाकल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरून एकच खळबळ माजली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या रणजित कासलेला या लोकांनी 10 लाख रुपये दिले, तर इतर लोकांना किती दिले असतील? असा सवाल या प्रकरणी शरद पवार गटाचे परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.