digital products downloads

राज-उद्धव मिठी अन् ठाकरेंनी एकत्र येण्याची 5 कारणं चर्चेत; BJP ला म्हणाले, ‘वाकड्यात जाल तर…’

राज-उद्धव मिठी अन् ठाकरेंनी एकत्र येण्याची 5 कारणं चर्चेत; BJP ला म्हणाले, ‘वाकड्यात जाल तर…’

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही जुने मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येणार असल्याची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची तयारी दर्शवली. यानंतर उद्धव ठाकरेंनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अगदी सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. असं असतानाच आता थेट दादारमधील शिवसेनाभवनाबाहेर ठाकरे बंधुंना एकत्र येण्याचं आवाहन करणारं बॅनर झळकलं असून हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं काय आहे या बॅनरवर?

दादरमधील शिवसेना भवनासमोर झळकवण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना मिठी मारताना फोटो छापण्यात आला आहे. पार्ले पंचमतर्फे झळकावण्यात आलेल्या बॅनरच्या वरील भागात, “अभिनंदन ठाकरे बंधुंनो! लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या” असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या गळाभेटीचा एक फोटो छापण्यात आला असून ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची गरज का आहे यासंदर्भातील 5 मुद्दे मांडण्यात आले आहेत.

बॅनरवर मांडले ठाकरेंनी एकत्र येण्यासाठीचे पाच मुद्दे

बॅनरवरील पाच मुद्दे खालीलप्रमाणे…

1) मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे. त्याला घर खरेदीत आरक्षण मिळवण्यासाठी ठाकरे बंधुंनो एकत्र या.

2) मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महापालिकेवर भगवा फटकवण्यासाठी ठाकरे बंधुंनो एकत्र या.

3) मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधुंनो एकत्र या.

4) शिवरायांचा महाराष्ट्रधऱ्म टिकवण्यासाठी ठाकरे बंधुंनो एकत्र या.

5) बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधुंनो एकत्र या.

बॅनरच्या तळाशी, “मराठी माणूस आशेने बघतो आहे, ठाकरे बंधुंनो! एकत्र या, एकत्र या, एकत्र या,” असं लिहिलेलं आहे. 

बॅनरमधून भाजपालाही डिवचलं

याचप्रमाणे दादरमधील विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनीही राज ठाकरेंचे फोटो असलेली बॅनरबाजी करत थेट भारतीय जनता पार्टीला डिवचलं आहे. “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही लक्षात ठेवा,” असं या बॅनरवर म्हटलं आहे.

“बीजेपीने लावली युक्ती, म्हणजे हिंदीची सक्ती, हीच महाराष्ट्राची भक्ती? पण खबरदार… जर महाराष्ट्रावर आणाल हिंदीची जबरदस्ती तर मा. राजसाहेबांकडे आहे मराठीची आणि हिंदुस्त्वाच्या अस्मितेची बाणेगात गुप्ती… हिंदींनो आमची मायमराठी तुम्हाला का खुपली? बाकीच्या राज्यांत बरी हिंदी मस्त झोपली, याद राखा जर जबरदस्तीने कराल हिंदीची सक्ती तर महाराष्ट्रतील जनताच उतरवेल आपली हिंदीच्या सत्तेची मस्ती,” असं या बॅनरवर लिहिलेलं आहे.

राज-उद्धव मिठी अन् ठाकरेंनी एकत्र येण्याची 5 कारणं चर्चेत; BJP ला म्हणाले, 'वाकड्यात जाल तर...'

तसेच बॅनरमधील काव्याच्या शेवटच्या ओळीमध्ये, “नका करु आमच्याशी दोस्ती, पण वाकड्यात जाल तर आम्ही हिंदू मराठी करु जोरदार कुस्ती,” असा मजकूर लिहिलेला दिसत आहे.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp