
Mumbai Bullet Train Station Video: मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचं जाळ उभारण्याचं काम सुरु आहे. अनेक ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ शेअर केला असून या माध्यमातून मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचं काम सध्या कुठपर्यंत पोहोचलं आहे याची माहिती दिली आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी व्हिडीओ शेअर केला असून, पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मुंबईचं बुलेट ट्रेन स्थानक जमिनीच्या 100 फूट खाली आकार घेत आहे”.
दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्राशी संबंधित रेल्वे प्रकल्पांसाठी 1 लाख 73 हजार कोटींना मंजुरी दिली असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं की, “आतापर्यंत महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्प ज्यामधे बुलेट ट्रेन, कॉरिडोअर्स आणि स्थानकांचा पुनर्विकास यासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्पांची किंमत 1 लाख 73 हजार 804 कोटी आहे”.
Mumbai’s Bullet Train Station is taking shape 100 feet below ground! pic.twitter.com/to6nvDIf6I
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 21, 2025
2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासाठी 23 हजार कोटी वितरित करण्यात आले असल्याची माहिती दिली. “अशा मोठ्या प्रोजेक्टसाठी दरवर्षी निधीची गरज आहे. यामुळेच तुम्ही पाहिलं तर यावेळच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद दिसेल. यासाठी 23 हजार 778 कोटींची तरतूद आहे,” असं ते म्हणाले होते.
मागील युपीए सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, त्यांनी महाराष्ट्राला फक्त 1 हजार कोटी रुपये दिले होते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने 20 पटींनी वाढ केली. “जेव्हा युपीए सरकार होतं, तेव्हा महाराष्ट्राला 1171 कोटी मंजूर करण्यात आले होते, पण आता मोदींनी 20 पट जास्त दिलं आहे. यामुळे रेल्वेच्या नेटवर्कमध्ये फार मोठा बदल होईल,” असं ते म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.