
अवधेश आकोदिया | जयपूर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी भलेही लष्कर-ए-तोयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) घेतली असली तरी त्या कटात हमासही सहभागी झाली होती. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आणि पद्धती हमासशी मिळती-जुळती असल्याचे म्हटले आहे. पॅलेस्टाइनची अतिरेकी संघटना हमासचे ३ अव्वल कमांडर- डॉ. खालिद कद्दूमी, डॉ. नाजी जहीर आणि मुफ्ती आझम गेल्या ६ महिन्यांपासून पाकमध्ये कॅम्प चालवत आहे. तिघे पाकमधून ऑपरेट होणाऱ्या ताेयबा, जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए- मुस्तफासारख्या दहशतवादी संघटनांच्या कायम संपर्कात आहेत. तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाहची अनेकदा भेट घेतली. सुरक्षा संस्थांना माहिती मिळाली आहे की, यादरम्यान पहलगाम हल्ल्याची आखणी करण्यात आली.
गाझात पकड ढिली, पाकमध्ये पाय पसरतेय हमास
कद्दुमी इस्रायली हल्ल्यांनंतर जिवंत राहिलेल्या हमासच्या निवडक अव्वल कमांडरपैकी एक आहे. गाझा युद्धाआधी तेथे हमासचे ३० हजारांहून जास्त हस्तक होते,आता ३ हजार शिल्लक आहेत. कद्दुमीने पाकिस्तानी संसदेतही भारतविरोधी मोहिमेची गरळ ओकत सांंगितले की, हमास असताना भारत चीन-पाक आर्थिक कॉरिडॉर रोखू शकणार नाही. हमासच्या पहलगाम हल्ल्यात सहभाग होण्याची प्राथमिकदृष्ट्या पुष्टी मिळाल्यानंतर सुरक्ष संस्था त्याचे पुरावे जमा करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.