
पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने पोस्ट केलेला एक फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘सर तन से जुदा’ ही पाकिस्तानी अतिरेक्यांची मानसिकता असून, हीच म
.
चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निर्घृण हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांबद्दल शोक संवेदना व्यक्त होत आहेत. अशा शोकसंतप्त वातावरणात देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता काँग्रेस पक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांना बळ देण्याचे घृणास्पद कृत्य करीत आहे, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
काँग्रेस पक्षाने आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अपमान करणारे चित्र प्रसिद्ध केले आहे. “सर तन से जुदा” ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची मानसिकता आहे, हीच दहशतवादी मानसिकता काँग्रेस पक्षाने या चित्रातून व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाच्या या देशविरोधी कृत्याचे पाकिस्तानात स्वागत होत आहे, ही या पक्षासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. हा या देशातील नागरिकांचा अपमान आहे. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या बलिदानाचा हा अवमान आहे. दहशतवादी कृत्यामुळे जेवढ्या वेदना या कुटुंबियांना झाल्या नाहीत, त्यापेक्षा कितीतरी अधिक तीव्र वेदना काँग्रेस पक्षाच्या देशविरोधी कृत्यामुळे झाल्या आहेत.
देशावरील या भयाण संकटावेळी देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा हा छुपा अजेंडा दिसतो. या देशातील जनता काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या कथित कथित वादग्रस्त पोस्ट काय?
काँग्रेसने सोमवारी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरीर फोटो शेअर केला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ पेहराव दिसून येत होता. त्यांचे शरीर दिसत नव्हता. पंतप्रधान मोदी जबाबदारी घेण्याच्या वेळी नेहमीच गायब होतात, असा आरोप काँग्रेसने या पोस्टद्वारे केला होता. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी काँग्रेसच्या या भूमिकेचे समर्थन केले असून, अनेकांनी त्याचा विरोध केला आहे.
22 एप्रिलला झाला होता अतिरेकी हल्ला
उल्लेखनीय बाब म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलागममध्ये अतिरेक्यांनी गत 22 तारखेला भयंकर अतिरेकी हल्ला केला होता. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसनेही या प्रकरणी सरकारकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. पण सरकारने अद्याप त्यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.