
Jio Recharge Offer: चांगले नेटवर्क आणि स्वस्तातला रिचार्ज प्लान शोधणारे ग्राहक जिओचा पर्याय निवडतात. कारण जिओ दरवेळेस ग्राहकांच्या गरजेनुसार नवनवीन रिचार्ज प्लान आणत असतो. त्यामुळे जिओकडे जास्तीत जास्त ग्राहक आणि जास्तीत जास्त प्लॅन पर्याय दोन्ही आहेत. सध्या देशभरात 46 कोटींहून अधिक लोक त्यांच्या फोनमध्ये जिओ सिम वापरतात. जिओ ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
सर्वात मोठा ग्राहकवर्ग असलेला जिओ आपल्या ग्राहकांच्या गरजांची चांगली काळजी घेतो. जर तुम्हीदेखील जिओ सिम वापरत असाल तर अशा प्लॅनबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही 11 महिने अनलिमिटेड कॉलिंग करु शकता.
रिलायन्स जिओकडे त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे स्वस्त आणि परवडणारे प्लॅन आहेत. जिओने वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्लान आणले आहेत.
अलिकडच्या काळात मोबाईल यूजर्समध्ये जास्त वॅलिडीटीची मागणी प्रचंड वाढलीय. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन जिओने जास्त वॅलिडीटी असलेल्या योजनांची संख्या देखील वाढवलीय. जिओकडे एक असा प्लॅन देखील आहे जो ग्राहकांना 11 महिन्यांसाठी रिचार्जच्या कटकटीतून मुक्त करतो. जिओच्या या प्लॅनमुळे एअरटेलचे टेन्शन वाढलंय.
स्वस्त जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये फक्त 80 रुपयांच्या मासिक किमतीत 11 महिन्यांची वॅलिडीटी मिळतेय. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 895 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना एकूण 336 दिवसांची वॅलिडीटी देते. या प्लॅनमध्ये तुम्ही संपूर्ण 11 महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता. यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करावे लागणार नाहीत.
जिओ आपल्या ग्राहकांना दरमहा 50 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सुविधा देतंय. तुम्ही हे सर्व नेटवर्कसाठी याचा वापर करु शकता. आता जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला कमी इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये जिओ दरमहा 2 जीबीपर्यंत हाय स्पीड डेटा मिळतोय. तुम्ही 336 दिवसांत एकूण 24 जीबी डेटा वापरू शकता.
जिओची ही खास ऑफर जाणून घेतल्यानंतर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा हा प्लॅन सर्व यूजर्ससाठी नसेल. जिओने हा प्लॅन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जिओ फोन आणि जिओ भारत फोन यूजर्संसाठी लाँच केलाय. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकणार नाही. जर तुम्हाला महागड्या रिचार्ज प्लॅनचा खर्च टाळायचा असेल तर तुम्ही कॉलिंगसाठी जिओ फोन खरेदी करू शकता आणि या 895 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.