
Navi Mumbai News: 20 वर्षांपूर्वी बांगलादेशी तरुणाने सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. जवानांची नजर चुकवून मुंबईत आला. इथे येऊन मजुरांचे काम करु लागला. तिथेच नवी मुंबईतील एका महिलेशी त्याची ओळख झाली. दोघांचेही एकमेकांवर प्रेम बसले. त्यानंतर दोघांनीही लग्न करुन संसार थाटला. मात्र लग्नानंतर मुलं झाल्यानंतर महिलेला आपला पती बांगलादेशी असल्याचे समोर आले. मात्र मुलांसाठी तिने कोणालाही काही सांगितले नाही. मात्र अखेर त्याचे भांडे फुटलेच. सबूर उर्फ इब्राहिम रोकाला शेख असं नाव असलेल्या बांगलादेशी तरुणाला कफपरेड पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. 2004 मध्ये ते एजटंच्या मदतीने मुंबईत आला. नवी मुंबईत काम करत असताना एका महिलेशी त्याची ओळख झाली आणि त्याने खरी ओळख लपवत तिच्याशी लग्न केले. त्यांना मुलंदेखील झाली. मात्र, वडिलांचे निधन झाले म्हणून तो परत त्याच्या मुळ गावी बांगलादेशला गेला. 2007मध्ये तो पुन्हा मुंबईत आला. तेव्हा अनेक वर्षांनी पती घरी परतल्याने पत्नीला संशय आला आणि तिने चौकशी केल्यानंतर तो बांगलादेशी असल्याचे समजते. तरुणाकडे आधार आणि मतदार कार्डदेखील होते.
3 मे रोजी आरोपीचे बिंग फुटले तो कफपरेड पोलिस ठाण्याच्या आरसी चर्चमध्ये आल्याची माहिची पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचत शेख याला ताब्यात घेतले. तसंच, त्याने तयार केलेले बनावट कागदपत्रदेखील हाती लागले तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.
सात बांगलादेशींवर कारवाई
ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये दोन कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील सातही वाशीला राहण्यास होते.
पियार अली (७१), फरीद अली (३०), सुहाना शेख (२५), मोहम्मद शेख (४०), अहमद शेख (३), अस्लम शेख (१९), मोहम्मद शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत.
कल्याण-डोंबिवलीत सहा बांगलादेशी
कल्याण- डोंबिवलीत सहा बांगलादेशी नागरिक सापडले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस उपायुक्त पथकाने कारवाई केली आहे. हे बांगलादेशी प्लंबर आणि वायरमनचे काम करीत होते. कबीर काझी, रफीक काझी, रब्बी हुसेन, खैरुल अली मंडल, शहा आलम शेख अशी त्यांची नावे आहेत. आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. याप्रकरणी टिळकनगर, महात्मा फुले चौक, खडकपाडा, बाजारपेठ या पोलिस ठाण्यांत चार गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाने केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.