
Mumbai News Today: मुंबईतील गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचबरोबर मुंबईतील जमिनीचे आणि घरांचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. मात्र अशापरिस्थितीतही मुंबईत जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना दिसत आहेत. मात्र मुंबईप्रमाणेच आता महामुंबईतदेखील जागांचे भाव वाढले आहे. तिथेदेखील मोठ्या प्रमाणात जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार होताना दिसत आहेत. गेल्यावर्षी महामुंबईत 407 एकर जागेचे विक्रमी भूखंड व्यवहार झाले असून हे व्यवहार बांधकाम उद्योगाशी संबंधित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणानुसार, 2024 मध्ये महामुंबईत गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक जमीनी खरेदीचे व्यवहार झाले. गेल्यावर्षी या 19 व्यवहारातून 407 एकर जागेची विक्री झाली. हे व्यवहार खालापूर, पनवेल, खोपोली, अलिबाग या परिसरात झाले होते. यापैकी बहुसंख्य व्यवहारात 50 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जागा घेण्याकडे विकासकांचा कल असल्याचे समोर आले आहे. या जागांमधील सर्वाधीक कमी व्यवहार हा 17 कोटींचा तर सर्वाधिक मोठा व्यवहार 100 कोटी रुपयांना झाला आहे.
मुंबईतील घरांची किंमत अव्वाच्या सव्वा वाढली आहे. त्यामुळं अनेकजण मुंबईबाहेर घर घेण्यासाठी जास्त पसंती देतात. तसंच, महामुंबईत सेंकड होमसाठीही अनेक जण पर्याय निवडतात. अशावेळी अनेक विकासक पनवेलपुढील शहरांत मोठे प्रोजेक्ट राबवण्यावर भर देत आहेत. त्यामुळं महामुंबईतील जमिनींनादेखील सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळं जागांचे व्यवहार कोट्यवधी रुपयांमध्ये होत आहेत.
‘अटल सेतू’मुळे फायदा
‘अटल सेतू’मुळे नवी मुंबई ते मुंबईचा प्रवास आणखी सोप्पा झाला आहे. त्यामुळे त्यामुळे पनवेलमध्येही सध्या अनेक विकासकांनी महाकाय निवासी संकुलांची निर्मिती सुरू केली आहे. तर, लवकरच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात देखील अनेक महत्त्वाच्या विकासकांनी जमीन खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, मुंबईनजीकच्या ठाणे येथे गेल्यावर्षी जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यात एका खासगी कंपनीने कळवा येथे साडेचोवीस एकर भूखंड खरेदी 537 कोटी 42 लाख रुपयांना केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.