
Vasai Crime News: वसईत 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीला आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी मुलाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस, असे सांगून लग्नाला नकार दिल्याने तरुणी नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. पीडित तरुणी ही वसईत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिचे आयुष राणा या तरुणासोबत मागील 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून आयुषने वारंवार तिच्याशी शरीरसंबंध ठेवले होते. मात्र नंतर तिला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला टाळू लागला.
तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे. तसेच तू खालच्या जातीची असल्याने माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही, असे आयुषच्या वडिलांनी तरुणीला सांगितले. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणीने राहत्या घरी उंदीर मारायचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
नवा व्यापार खेळताना मित्रांमध्ये भांडण, एकाची हत्या
नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झालं. त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी 19 सोहेब शेखला अटक करण्यात आलीये. 16 वर्षीय गणेश कुऱ्हाडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते. कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली. मात्र खेळता-खेळता वादाला तोंड फुटले, मग सोहेबने कार्तिकला मारहाण केली. त्यानंतर खेळ अर्धवट सोडून सगळे आपापल्या घरी परतले. कार्तिकने घरी येताच मोठा भाऊ गणेशला याबाबत सांगितले. गणेशने सोहेबकडे जात त्याला जाब विचारला. लहान असताना जाब कसा काय विचारला? या रागातून सोहेबने गणेशच्या पायात-पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन लाथांनी मारहाण ही केले. या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तातडीनं रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न ही झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गणेशचा मृत्यू झाला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.