
अमित शहा यांच्या नेतृत्वात शरद पवार यांनी काम करावे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ यांनी उपस्थित केला. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही, ही आमच्या पक्षाचे आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यासाठी राजकारण सोडून बाजू
.
या संबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार हे काल देखील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र होते. ते एकत्रच आहेत. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्यांनी आमचे सरकार पाडले, ज्यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी हात मिळवणी आम्ही करणार नाही. ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे. मग जे होईल ते होईल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेची भूमिका पक्की आहे. ‘त्यासाठी सत्ता गेली याच्यात….’ अशा शब्दात संजय राऊत यांनी भावना व्यक्त केली आहे.
आमचे साखर कारखाने किंवा शिक्षण संस्था नाहीत
आमचे साखर कारखाने किंवा शिक्षण संस्था नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीच चिंता नाही. जे आमच्याकडे होते ते ईडीने आधीच घेतले आहे. त्यामुळे आम्ही परखडपणे उभे आहोत. त्या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आम्ही उभे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले आहेत. उद्या ते आणखी पन्नास जण उभे करतील. ते महाराष्ट्राची वाताहत करत असल्याचा आरोप करत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
अमित शहा यांच्या पक्षात सुप्रिया सुळे जाणार आहेत का? माझ्या पुस्तक प्रकाश कार्यक्रमात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्व एकत्र येणार आहोत. शरद पवार यांच्या विषयी माझ्या मनात काही तक्रार नाही. फुले चित्रपट पाहायला गेलेले असताना शरद पवारांच्या समोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होते. फुले – आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार… शरद पवार… अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे फुले आंबेडकरांचे वारसदार गद्दार आणि भाजपच्या बैठकीला जातील असे मला वाटत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराचे शरद पवार हे वारसदार आणि शिल्पकार आहेत. शरद पवार त्यांचा पक्ष संघर्षातून उभा केला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष खरे नाहीत. हे अमित शहा यांचे पक्ष आहेत. हे अमित शहा यांनी निर्माण केलेले पक्ष आहेत. हे मी त्यांच्या तोंडावर देखील सांगतो. अमित शहा यांच्या पक्षात सुप्रिया सुळे जाणार आहेत का? असा प्रश्न राऊत त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांनी अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अजित पवार यांनी अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पार्किंग स्लॉटमध्ये त्यांना थोडी जागा मिळाली. त्यांनी तिथे गाडी उभी केली आहे. एकनाथ शिंदे यांचे देखील तसेच आहे. मात्र आम्ही तसे नाहीत. आमची शिवसेना तशी नाही, एवढेच मी सांगू शकतो, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.