
नांदुरा बुजरुक सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेले सहकार पॅनलचे उमेदवार
जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावती तालुक्यातील एक आणि नजिकच्या भातकुली तालुक्यातील दोन अशा एकूण तीन सेवा सहकारी सोसायट्यांच्या संचालकांसाठी आज, रविवारी मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते दुपारी ४ अशी मतदानाची वेळ होती. दरम्यान उशीरा सायंकाळी त्याच ठिकाणी मत
.
विजयी झालेल्यांमध्ये नरेश अग्रवाल, शंकर कवाने, चंद्रशेखर किरक्टे, नितीन किरक्टे, योगेंद्र किरक्टे, विनोद किरक्टे, शैलेश किरक्टे, कुंदन गौरीहार, ज्ञानेश्वर चौधरी, धनंजय दीवाण, मोहन देशमुख, नरेश बावणे व साबीर अली सय्यद जयतुल्ला यांचा समावेश आहे.
अमरावती तालुक्यातील नांदुरा बुजरुक तसेच भातकुली तालुक्यातील निंबा व पूर्णानगर या तीन सेवा सहकारी सोसायट्यांसाठी आज, रविवारी मतदान घेण्यात आले. नांदुरा येथे सर्व १३ संचालकांसाठी, तर निंबा व पूर्णानगर येथे डझनभर उमेदवार अविरोध विजयी झाल्याने सर्वसाधारण मतदारसंघातील प्रत्येकी एकाच जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात मतदानासाठी बऱ्यापैकी गर्दी जमली होती. पुढे मात्र ती हळूहळू कमी होत गेली. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा बऱ्यापैकी असल्याने मतदार कमी संख्येने घराबाहेर पडले. परंतु याच काळात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्यामुळे संबंधित सेवा सहकारी संस्थांचे मतदार बऱ्यापैकी बाहेर पडून मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झाले.
सतत लांबत गेल्या निवडणुका
सप्टेंबर २०२४ पासून रखडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका या-ना-त्या कारणाने सतत पुढे ढकलण्यात येत होत्या. गतवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमुळे त्या पुढे रेटल्या गेल्या. दरम्यानच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितांचाही या निवडणुकांना फटका बसला. त्यामुळे त्या यावेळी घेण्यात येत आहे. दरम्यान निवडणुका घेण्यास विलंब झाल्यामुळे मतदानाच्या दिवशी बरीच चुरस दिसून आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.