
Maharashtra Board 10th SSC Result 2025 Latest Updates in Marathi: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीमागोमाग आता इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर केला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील दहावी निकालाची संपूर्ण आकडेवारी आणि महत्त्वाचा तपशील जाहीर केला.
कुठे पाहता येईल महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल? (How To Check Mahrashtra Board SSC Result 2025)
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org
यंदाच्या वर्षी राज्यात दहावीचा एसएससी बोर्डाचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला. यंदाही कोकण विभाग निकालात अव्वल ठरला असून, हा निकाल 98.82 टक्के इतका लागला. तर, निकालात 90.78 टक्क्यांसह नागपूर विभाग सर्वात मागे असल्याचं स्पष्ट झालं.
विभागनिहाय आकडेवारी (टक्क्यांमध्ये) खालीलप्रमाणे
पुणे – 94.81
नागपुर – 90.78
संभाजी नगर – 92.82
मुंबई – 95.84
कोल्हापूर – 96.87
अमरावती – 92.95
नाशिक 93.04
लातूर – 92.77
कोकण – 98.82
एकूण – 94.10
नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पुढीलप्रमाणे
मार्च 2024 चा निकाल 95.81 टक्के आहे असून फेब्रु.-मार्च 2025 चा निकाल 94.10 टक्के आहे. ज्यामुळं मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रु.-मार्च 2025 चा निकाल 1.71 टक्क्यांनी कमी लागला.
मुलींनी मारली बाजी
यंदाच्या दहावी निकालात मुलींनीच बाजी मारली असून, परीक्षेतील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 96.14, तर मुलांची 92.31 टक्के इतकी आहे. यंदा राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले. तर, संपूर्ण राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के इतके गुण मिळाले. 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना 75 टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळाले.
यंदाही राज्यात लातूर पॅटर्न…
100 टक्के मिळालेले विद्यार्थी 211
पुणे -13
नागपूर-3
संभाजीनगर-40
मुंबई-8
कोल्हापूर-12
अमरावती-11
नाशिक-2
लातूर-113
कोकण-9
निकालाची ठळक वैशिष्ट्यं खालीलप्रमाणे…
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
वरीलपैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 इतकी आहे.
दहावीच्या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 इतकी आहे.
7924 शाळांचा निकाल 100 टक्के
पुणे -1311
नागपूर-736
संभाजीनगर-678
मुंबई-1579
कोल्हापूर-1114
अमरावती-789
नाशिक-776
लातूर-446
कोकण-486
शून्य टक्के निकाल 49 शाळा
पुणे -7
नागपूर-8
संभाजीनगर-9
मुंबई-
कोल्हापूर-1
अमरावती-4
नाशिक-4
लातूर-10
कोकण-1
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.