
इंदूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मुक्ताईनगर येथील जमिनीच्या दराचा विषय विधान परिषदेत उपस्थित झाला होता. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी
.
महानगरपालिकेच्या सभागृहात गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीपुरवठा व नागनदी प्रकल्पासह विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत गडकरींनी हे निर्देश दिले. गडकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक घ्यावी. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शेतकरी, संबंधित विधान परिषद सदस्य यांना बोलवावे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांना आमंत्रित करून त्यांचे अभिमत घ्यावे. त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही गडकरी यांनी दिले.
पाणी पुरवठ्यात सुधारणा करा
नागपूर शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यूने एक महिन्याच्या आत सुधारणा करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, या शब्दांत गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बजावले. त्याचवेळी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. नागपूर शहरात मुबलक पाणी येत असतानाही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. त्यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत मंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या. त्याचा आढावा आज, सोमवारी घेण्यात आला. एक महिन्याच्या आत यावर अंमलबजावणी झाली नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.