
मुलांना वाचनाची गोडी लावणारी बाल पुस्तक जत्रा ही पुण्यापुरती राहता कामा नये, तर तिचा प्रसार राज्यभरात व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाल पुस्तक जत्रेचे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहोत, अशी मा
.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, महापालिकेचे अधिकारी सुनील बल्लाळ, राजेश कामठे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, सुनील महाजन, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात प्रकाशकांची साधारण ७० पुस्तकांची दालने असून, त्यात बालसाहित्याला वाहिलेल्या दालनांचा समवेश आहे.
सामंत म्हणाले की, पूर्वीची लहान मुले आणि आताची लहान मुले यांच्यातील फरक आपला स्पष्ट जाणवतो. पूर्वीच्या मुलांना आजार होत नाही, तर आताच्या मुलांची प्रकृती फार लवकर बिघडते. पुस्तकांची जत्रा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, त्याला जोड भारतीय पारंपरिक खेळांची दिल्याने मुलांसोबतच पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मराठी भाषेला पाठबळ देणारा मित्र उदय सामंतसोबत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यामुळे पुणे पुस्तक बालचत्रेसारखे उपक्रम राज्यभरात उत्साहाने पडावेत, अशी इच्छा सामंत यांनी व्यक्त केली.
मिसाळ म्हणाल्या की, लहानपणी भरपूर खेळ खेळल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, हे आज कळतं आहे. आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. अशाच पद्धतीने लहानपणी पुस्तके वाचण्याची सवय लागली. त्याचा फायदा आज होत असून, अनेक ऐतिहासिक पुस्तके आपण वाचलेली असतात. पुस्तक हातात घेऊन, वाचण्याची गंमत लॅपटॉप किंवा संगणकावर वाचून मिळत नाही. त्यामुळे मुलांनी वाचण्यासोबतच पारंपारिक भारतीय खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा.
पांडे म्हणाले की, दिल्ली येथे भरणाऱ्या येथे वर्ल्ड बुक फेअरमध्ये मुलांसाठी शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्याबाबत कल्पना सुचली. या कल्पनेचे पुणे पुस्तक बाल जत्रेत रूपांतर करण्यात आले. पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे येत्या रविवारपर्यंत पुणे पुस्तक बाल जत्रेला प्रतिसाद द्यावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.