
Monsoon Latest Update : अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या माऱ्यानं महाराष्ट्राला झोडपून काढलेलं असतानाच आता प्रत्यक्षाच मान्सूनचे वारे अर्थात नैऋत्य मोसमी वारे नेमके कुठवर पोहोचले हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंदमान आणि निकोबार बेट समुहांवर दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास अतिशय समाधानकारक वेगात पुढील रोखानं सुरू झाला. पुढे श्रीलंका, बंगालचा उपसागर असे टप्पेही त्यानं गाठले, ज्यामुळं मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात आणि केरळात दाखल होणार असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं मात्र या मोसमी वाऱ्यांच्या वाटेत काही अंशी अडथळा आणल्याची प्राथमिक शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण, नैऋत्य मोसमी वारे बुधवारपासून एकाच जागी स्थिरावले/ रेंगाळले आहेत. गुरुवारीसुद्धा या वाऱ्यांची फारशी प्रगती झालेली नाही.
असं असलं तरीही मान्सून्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मिती होत नाही, अशी परिस्थिती सथ्या उदभवली नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. मान्सून वाऱ्यांचा सध्याचा वेग पाहता 25 ते 27 मे दरम्यान मोसमी वारे करेळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. मान्सूननं मागील 24 तासांमध्ये अपेक्षित प्रगती केली नसली तरीही पुढील 48 तासांमध्ये मात्र तो नक्कीच आगेकूच करण्याची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून करणार प्रगती
प्राथमिक निरीक्षण आणि अंदाज पाहता पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिणेसह इतर काही भागात प्रगती करत मालदीव आणि कोमोरिनचा उर्वरित भागही व्यापतील. ज्यानंतर लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडूसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हे वार धडकतील.
गोवा आणि तळकोकणात मान्सूच्या वाऱ्यांच्या प्रभावाअंतर्गत 1 जूनपासून जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यानच्या काळात सागरी हालचालींमुळं आणि वाऱ्यांच्या स्थितीमुळं मासेमारांनी खोल समुद्रता जाऊ नये असाही इशारा जारी करण्यात आला आहे. थोडक्यात महाराष्ट्रात मान्सून आता जून महिन्यातच धडकणार असून, सध्या मान्सूनपूर्व सरींवरच समाधान मानावं लागेल हीच वस्तूस्थिती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.