
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक
.
रोहिणी खडसे आपल्या पत्रात म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ह्या त्यांच्या पक्षातही एका प्रमुख पदावर आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी वेळ मिळत नसावा. पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये. कारण, त्याचा थेट परिणाम थेट महिलांवरील प्रश्नांवर पडतो. त्यामुळे आता राज्याला पार्टटाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोगाच्या अध्यक्षा हव्यात अशी जनतेची भावना आहे. त्यानुसार महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणे करून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल.
खाली वाचा रोहिणी खडसेंचे पत्र जशास तसे
आपल्या भारतीय संविधानात देशातील महिलाचं्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींनुसार राज्य सरकारने 1993 साली राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महिला आयोगाची स्थापना केली. महिलांच्या हक्कांचे संरङण करणे, महिलाना न्याय वागणूक मिळून देणे, महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन करणे असे बहुद्देश त्यामागे होते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, ताकद महिला आयोगाला देण्यात आली आहे.
सध्या राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण केंद्रस्थानी आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे आहे असे स्पष्ट दिसत आहे. आत्महत्या करण्याआधी सासरच्या मंडळींनी वैष्णवी यांचा प्रचंड छळ केला होता असे अनेक उदाहरणे आता समोर येत आहेत. हगवणे कुटुंबात फक्त वैष्णवी यांचाच छळ केला गेला नाही, तर त्यांची मोठी सून मयुरी हगवणे यांचा देखील अशाच प्रकारे छळ करण्यात आला होता. मयुरी यांनी त्यावेळी महिला आयोगात धाव घेतली मात्र त्याबाबत काही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का? असा आमचा प्रश्न आहे. जर ममहिला आयोगाने मयुरी यांच्याच प्रकरणात कठोर पावले अचलली असती तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती.
महोदय आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अन्यायकारक वागणूक वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून हडपसरमध्येही एका महिलेने आत्महत्या केली आहे. दीपा प्रसाद पुजारी असे त्या महिलेचे नाव आहे. मध्यंतरी पुण्यात एका परदेसी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातही सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आले होते. हे प्रकरणही प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. त्या विदेशी महिलेला न्याय मिळाला की नाही याबाबत काहीच थांगपत्ता नाही.
सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडत आहेत, पण महिला आयोग महिलांना न्याय देण्यात असमर्थ ठरत आहे. सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात लक्ष घालण्यास वेळ मिळत नसावा. पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये. कारण, त्याचा थेट परिणाम महिलांवरील प्रश्नांवर पडतो. त्यामुळे आमची मागणी आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणे करून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल. आमच्या मागणीचा तुम्ही गांभिर्याने विचार कराल ही अपेक्षा, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.