
Maharashtra Monsoon: मान्सूनची तळकोकणात धडाक्यात एन्ट्री झालीय. नियोजित वेळेच्या आठवडाभर आधीच मोसमी वारे तळकोकणात पोहोचले आहेत.केरळात आठवडाभर आधी डेरेदाखल झालेला मान्सून महाराष्ट्रातही तब्बल आठ दिवस आधीच दाखल झालाय. 24 मे रोजी म्हणजेच काल केरळात दाखल झालेल्या मोसमी वा-याने अवघ्या एका दिवसात कर्नाटक, गोव्याचा प्रवास पूर्ण करत थेट महाराष्ट्रात धडाकेबाज प्रवेश केलाय.त्यामुळे मान्सूनला यंदा जरा घाईच असल्याचं दिसंतय. अंदमान-निकोबारपाठोपाठ केरळ आणि आता राज्यतही मान्सून नियोजित वेळेआधी दाखल झालाय.
पुढील 2 दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा 4 ते 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील चार दिवसांत कोकण व गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. नैऋत्य मान्सून 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाला. सामान्यत: तो 1 जून रोजी दाखल होतो. म्हणजेच नैऋत्य मान्सून केरळमध्ये सामान्य तारखेच्या 8 दिवस आधी दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर आला होता. कृष्णा नदीवरील राजराम बंधारा ओव्हरफ्लो झालाय.मान्सून दाखल होण्याआधीच राजाराम बंधारा तुडुंब झालाय.बंधारा भरल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय.
इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सून
आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या लवकर मान्सून दाखल झाल्याचा विक्रम पाहायला मिळतोय. 1956,1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी राज्यात मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे 25 मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात आधी 1956 साली 29 मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला. यानंतर 31 मे 1990 रोजी लवकर मान्सून दाखल झाला. 29 मे 1962 ही लवकर मान्सून दाखल होण्याची तिसरी वेळ होती. 29 मे 1971 रोजीदेखील लवकर मान्सू दाखल झाला होता. 2006 साली 31 मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.