
Maharashtra Politics : बँकेचं कर्ज मिळवणं म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं काम. मात्र राजकारण्यांनाही सहज बँकेचं कर्ज मिळत नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. बँका, को-ऑपरेटिव्ह सोसायटी या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाही..कारण सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात ही आपलीच असते, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बँका, को-ऑपरेटिव्ह सोसायटी या पुढारी, राजकारण्यांना कधीच कर्ज देत नाही, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील एका खाजगी बँकेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून ही खंत व्यक्त केली. राजकारणी सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात आहे, त्यामुळे आपल्याला सहजासहजी कर्ज मिळत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमात बोलताना पाटिल यांनी सहकारक्षेत्रावर भाष्य केले. जिल्हा मध्यवर्ती बँकांप्रमाणेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आता राष्ट्रीयकृत बँका सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. सुरुवातीला राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना गुलाबराव पाटलाच्या कपड्यांकडे बघून कर्ज देत होत्या. मात्र, आता शेतकरी आणि बचत गटांना सुद्धा या बँका कर्ज द्यायला लागल्या आहेत.
मी माझ्या आयुष्यात को-ऑपरेटिव्ह संस्था काढल्या नाहीत. मी कुठलाही विकास सोसायटीचा संचालक सुद्धा नव्हतो. सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक सोपी आहे. सोसायटीमध्ये निवडून येणे मोठे अवघड आहे,असं म्हणत सहकारातील राजकारणाविषयीही भाष्य केले.
दरम्यान पाटलांच्या या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली.गुलाबराव पाटलांना माहिती आहे की ते कसे निवडून आले, असं म्हणत पेडणेकरांनी टीका केली. तर गुलाबराव काय म्हणतात मला माहीत नाही, मी मात्र रेग्युलर हप्ते भरत असतो, संजय शिरसाट यांनी म्हंटल आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.