
Maharashtra Weather Update : राज्यात 26 मे रोजी दाखल झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मान्सून यंदा काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पण आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी चार दिवस पावसाची ओढ कमी झाली आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे प्रवाह सध्या कमकुवत होत असल्यामुळे राज्यभरात पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. खास करुन कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडणार असून, मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
In this pre-monsoon season (March-may), Bharat recorded 42% above average rain. Most of the subdivisions recorded excess rain (blue color). Source: IMD pic.twitter.com/auhKIRm5Vz
— Dr. Vineet Kumar (@vineet_mausam) May 31, 2025
मान्सूनची गती मंदावण्याचे कारण काय?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमन केलं. पावसाने रचलेल्या विक्रमामुळे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र आता प्रवाह मंदावल्याने पुढील चाल धिमी झाली आहे. 12 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस दडी मारणार असल्याच हवामान विभागाने सांगितलं आहे.
पावसाची तीव्रता कमी झाली असून काही जिल्ह्यांना मात्र यलो अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांना काही भागात पेरणी थांबवण्याचा सल्ला दिला आहे. कारण विदर्भात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी असल्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. परंतू 12 जूननंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि इतर काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.