
Nilesh Chavan Arrest Update: पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) प्रकरणामध्ये वैष्णवीच्या बाळाचा ताबा असताना कस्पटे कुटुंबीयांना बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारत-नेपाळच्या सीमेवरुन अटक केल्यानंतर तो पोलिसांना कसा सापडला याची रंजक माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाणने पोलिसांना दहा दिवस चकवा देत नेपाळची सीमा गाठली. पण त्याची एक चूक त्याच्या अटकेला कारणीभूत ठरली…. नेमकी काय होती त्याची ही चूक पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये…
निलेश पळून जाताना सोबत लाखो रुपये घेऊन गेला
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर कस्पटे कुटुंबीयांना बंदुकीच्या जोरावर धमकावणाऱ्या निलेश चव्हाणने पिंपरी-चिंचवड पोलिसांना चांगलच दमवलं होतं. तब्बल दहा दिवस तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र त्याच्या एका चुकीने तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. गुन्हेगारी वृत्ती असल्याने निलेशने पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी पळून जाताना सोबत लाखो रुपये घेऊन गेला. कोणताही व्यवहार ऑनलाइन पद्धतीने न करता तो कॅशचा वापर करत होता. पण एवढी खबरदारी घेऊनही त्याने अखेर एक चूक केली आणि ती त्याला चांगलीच महाग पडली.
एका घटस्फोट मैत्रिणीला फिरायला जाऊ सांगत सोबत नेलं अन्…
पुणे सोडताना निलेशने त्याच्या एका घटस्फोटीत मैत्रिणीला फिरायला जाऊ असं खोटं सांगत सोबत नेलं होतं. ही मैत्रीणही विश्वासाने त्याच्याबरोबर पुण्याहून मुंबई आणि नंतर कर्जत, रायगडमार्गे अगदी दिल्लीपर्यंत गेली. दिल्लीला पोहोचल्यावर निलेशने या मैत्रिणीच्या फोनवरून त्याच्या एका व्यक्तीला फोन केला. या व्यक्तीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची आधीपासूनच नजर होती. पोलिसांना या व्यक्तीला आलेल्या फोनची माहिती मिळताच त्यांना निलेशच्या मैत्रिणीचे लोकेशन दिल्लीत असल्याचं समजलं आणि तिथूनच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली.
ती पुण्यात परतली अन्…
दिल्लीतून निलेश गोरखपुरला गेला आणि त्याची घटस्फोटीत मैत्रीण पुण्याला आली. ती पुण्यात परतताच पोलिसांनी तिची चौकशी केली आणि पोलिसांना निलेशच्या ठावठिकाण्याचा पहिला सुगावा मिळाला. त्याच्या अटकेसाठी हाच क्लू अत्यंत महत्त्वाचा ठरला.
नेपाळ बॉर्डरवरून अटक
निलेश गोरखपूरला याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळला आणि अखेर नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती निलेशच्या अटकेच्या दिवशी पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेली.
पोलिसांच्या जाळ्यात सापडला
एकूणच काय तर पिंपरी-चिंचवड पोलिसांना निलेशच्या घटस्फोटीत मैत्रिणीच्या माध्यमातून एक क्लू मिळाला आणि वैष्णवी हुंडाबळी प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या बंदूकबाज निलेश चव्हाणला ताब्यात घेणं पोलिसांना शक्य झालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.