digital products downloads

मोठी बातमी! रायगडावरील उत्खननात सापडलं गूढ यंत्र; उलगडणार अनेक शिवकालीन रहस्यं

मोठी बातमी! रायगडावरील उत्खननात सापडलं गूढ यंत्र; उलगडणार अनेक शिवकालीन रहस्यं

Raigad Fort Excavation: दुर्गराज रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने सुरू असलेल्या उत्खननादरम्यानएक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र (Astrolabe) म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिवकालीन होकायंत्र सापडले आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक  पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

कशासाठी होतो वापर?

खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे ‘Astrolabe’. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

नेमकं कुठे सापडलं हे यंत्र?

भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून  उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की, रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता, त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र (Astrolabe) खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी

दुर्गराज रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असं रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

कासव, सापासारख्या दोन प्राण्यांचे छाप…

या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. या वरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दिशांचा वेध घेण्याचे यंत्र

प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी अस्ट्रोलॅब म्हणजे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण वापरले जात होते. विशेषत: अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे यामुळे सोपे जात असे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp