
ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपीला कळमना पोलिसांनी उडीसा राज्यातून अटक केली. अविनाश संजय ढोके (वय ३४), पलाश विद्याधर वानखेडे (वय ३१, दोघेही नागपूर) व बुलबुल उर्फ व्हॉटसअॅप भाई सुकान्ता प्रधान (वय २४, बिसनाथपुर, संभलुपर, उडीसा) अशी आरोपी
.
आरोपी जवळुन २७ लाखांचा १०८ किलोग्रॅम झाडपत्ती सारखा हिरवट काळसर बिजा असलेला व पिवळसर रंगाचा उग्र वास येणारा ओलसर गांजा, एम. एच. ४०, वाय ९९६२ क्रमाकांचा आयसर सहा चाकी ट्रक, एम. एच. ३१, ई. के. ५२३२ क्रमाकांची काळ्या रंगाची महिन्द्रा एक्स. यु.वी. ५०० असा एकुण ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणांत अविनाश संजय ढोके (वय ३४), पलाश विद्याधर वानखेडे या दोघांना ३ जून रोजी पकडण्यात आले होते. तर बुलबुल उर्फ व्हॉटसअॅप भाई सुकान्ता प्रधान याला आरोपीतांकडून फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक तपासून गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले होते. अविनाश ढोके याला गांजा बाबत विचारपुस केली असता त्याने पलाश वानखेडे याने गांजाची खेप उडीसा राज्यातून आणल्याचे सांगितले.
पलाश वानखेडे याने गांजा उडीसातील व्हॉटसअॅप भाई उर्फ बुलबुल प्रधान याच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. त्याला अटक करण्यासाठी तपास पथकातील टिम तयार करून उडीसा राज्यात पाठविले. पोलिस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड आणि टिमने उडीसातील रारखोल गावात जावून सदर ठिकाणी आरोपी व्हॉटसअॅप भाई उर्फ बुलबुल प्रधान याला त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून अटक करून आणले आहे. आरोपीचा १२ जूनपर्यत पी.सी. आर. घेण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.