
Sangli Crime News: पुण्यातील वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याभरात खळबळ उडालेली असताना सांगलीमध्येही असाच एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे अशा तिघांना अटक केली आहे.
राहत्या घरात स्वत:ला संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेचं नाव ऋतुजा सुकुमार राजगे असं आहे. ती 27 वर्षांची होती. तिने 6 जून रोजी यशवंतनगरमधील अश्विनी सोसायटी येथील सासरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार ऋतुजाचा छळ केला जात होता असा आरोप ऋतुजाच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी ऋतुजाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारावर तिचा 29 वर्षीय नवरा सुकुमार राजगेला अटक केली आहे.
धर्मांतर करण्यासाठी दबाव
सुकुमारबरोबरच सासरे सुरेश राजगे (53) आणि सासू अलका राजगे (49) यांनाही पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केली आहे. सुकुमार राजगे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडून माझ्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती केली जात होती. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Sonam Raghuvanshi पेक्षाही निर्दयी सांगलीची राधिका! वटपौर्णिमेलाच पतीला संपवलं; नवरा झोपेत असताना…
लग्नापर्यंत माहिती नव्हतं की सासरचे ख्रिश्चन आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि सुकुमार यांचं 2021 मध्ये लग्न झालं. सुकुमार हा मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत असून तिथे तो सेकेंड ऑफिसर पदावर काम करतो. लग्नामध्ये पाटील कुटुंबाने जावयाला साडेचार तोळ्यांची सोन्याची चेन, अंगठ्या असा मानपान केलेला. धक्कादायक बाब म्हणजे सुकुमार आणि त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत हे ऋतुजा आणि तिच्या आई-वडिलांना लग्न होईपर्यंत ठाऊक नव्हतं.
हिंदू सण साजरे करण्यास नकार
जून 2021 मध्ये ऋजुताला लग्नानंतर पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा होता. मात्र सासूने तिला हा सण साजरा करु दिला नाही. लग्नानंतरच्या पहिल्या दिवळीलाही ऋजुताला तिच्या सासच्या मंडळींनी दिवाळी साजरी करायची नाही असं सांगितलं होतं. दिवाळी साजरी करण्यास नकार देण्याबरोबरच तिला थेट चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी येण्यास तिच्या सासरच्यांनी सांगितलं. “आमच्या घरात दिवाळी साजरी करत नाहीत. तू आमच्यासोबत चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी येत जा,” असं ऋजुताला सांगण्यात आलं. वारंवार सासरच्या मंडळींकडून चर्चेमध्ये येण्यासाठी ऋजुतावर दबाव टाकला जायचा. तिला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करायचा होता तो ही तिला करु दिला नाही.
गर्भवती असताना नवऱ्याकडून मारहाण
दरम्यान, ऋजुता गर्भवती राहिली. त्यावेळी तिच्यावर ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करण्याचा दबाव सासू-साऱ्यांबरोबरच नवऱ्याने टाकला. नवऱ्याने ऋजुताला गरोदर असताना मारहाण केली. ऋजुताने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याआधी तिच्या वडिलांनी तिच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला. मात्र त्यांना फारचं यश आलं नाही आणि ऋजुताने या सततच्या छळाला कंटाळून पोटात सात महिन्याचा गर्भ असताना जगाचा निरोप घेतला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.