
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी अहमदाबाद येथील विमानतळावर झालेल्या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हे
.
एकनाथ शिंदे म्हणाले, हे अतिशय वेदनादायी आहे. एकाच वेळी एवढ्या प्रवाशांचा दुर्घटनाग्रस्त विमानात मृत्यू होणे, हे मनाला दुःख देणारी दुर्घटना आहे. मी मृत्यू झालेल्यांच्या परिवरासोबत आम्ही सोबत आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. दुर्घटनेचा व्हिडिओ पाहिला तेव्हा अंगावर शहारा आला. महाराष्ट्रातील जे प्रवासी आहेत त्यांच्या नातेवाईकांना हेल्प डेस्क आपल्या कंट्रोल रूममध्ये तयार करण्यात आला आहे. यामुळे जी काही अपडेट असेल ती नातेवाईकांना मिळेल. तसेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमान प्रवासात होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
अहमदाबाद विमान दुर्घटना क्लेशदायक -अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विमान अपघात अत्यंत धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअरइंडियाचं विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळलं. ती संपूर्ण दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक होती. गुजरात पोलिस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहचून तातडीने बचाव व मदतकार्य तातडीने राबवलं. परंतु झालेली जिवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
अत्यंत धक्कादायक घटना – आदित्य ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद येथील विमान अपघाताबद्दल ऐकूण धक्का बसला, दुःख झाले. या दुर्घटनेत बचावलेल्यांच्या व विमानातील सर्वांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. अहमदाबाद जवळ एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघाताची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. या विमानात 242 नागरिक प्रवास करीत होते. त्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले असून, तपास सुरू आहे. या अपघातातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची मी आई जगदंबेकडे कामना करतो, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.