
Pre wedding Shoot On Dukes Nose: दोन्ही बाजूला डोंगराचे सुळके, मध्ये थेट खोल 500 ते 600 फूट खोल दरी..नजर थोडी जरी चुकली तरी मृत्यू अटळ. अशा दोन्ही सुळक्यांच्या मध्यभागी कोणी प्री वेडींग केले तर त्याला तुम्ही काय म्हणाल? सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये खोल दरीच्या वर मध्यभागी नेट लावून त्यावर प्रीवेडींग सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओला पसंतीपेक्षा ट्रोलिंगचा जास्त सामना करावा लागतोय. असे असे तरी व्हिडीओ करणारी मंडळी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आणि त्यांनी ट्रोलर्सना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलंय. नेमका काय आहे हा व्हिडीओ? कोणी शूट केलाय? त्यावर काय प्रतिक्रिया येतायत? सविस्तर जामून घेऊया.
रॉक क्यायंबर, स्लॅक क्लायनर ओंकार पडवळ यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. लोणावण्यातील ड्यूक नोस या ठिकाणी खोल दरीच्या मधोमध स्पेस नेट लावलेलं दिसतंय. ‘आज आपण स्पेस नेटवर फोटोशूट करतोय. मी मागच्या 8 वर्षापासून अॅडवेंचर स्पोर्ट्स करतोय. आता मी लग्न करतोय. माझी होणारी पत्नी या फिल्डमधील नाही. तिला मी या स्पोर्ट्सची ओळख करुन देतोय, असे ओंकार आपल्या व्हिडीओमध्ये सांगतोय. यानंतर टिक टिक वाजते डोक्यात गाणं बॅकग्राऊंडला लागतं आणि एक चित्त थरारक व्हिडीओ तुमच्यासमोर येतो. मध्यभागी ओंकारची पार्टनर नेटवर बसलेली दिसतेय. ज्यानंतर ओंकार रश्शीवरुन चालून येत साहसी खेळ करत तिच्यापर्यंत पोहोचताना दिसतोय.
व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया
ओंकारच्या या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण त्याचं कौतुक करतायत. भारी रे जगावेगळ काहीतरी करतोयस, असं एकाने म्हटलंय. तर ताई यायला तयार झाल्या यातच प्रेम दिसून येतं, अशी प्रतिक्रियाही दुसऱ्या एका यूजरने केली आहे. तुमच्या हिम्मतीला दाद द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया एकाने दिलीय. तर पार्टनरला स्पोर्ट्सची ओळख करुन देण्याचा पॅटर्न वेगळा असल्याची प्रतिक्रियाही एकाने दिलीय.
व्हिडीओ होतोय ट्रोल
चांगल्या प्रतिक्रियांसोबतच व्हिडीओला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. प्रेवेडींग राहायची बाजूला आणि लोकांना तेरावं करायला लागायचं अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिलीय. तुला याचा अनुभव आहे पण वहिनी इथे कशा केल्या असा प्रश्न एकाने विचारला. प्री वेडीग नव्हे ही *या गिरी आहे. कशाला रिस्क घेता? असा प्रश्न लोकं विचारतायत. अपघात झाल्यावर रडत जाऊ नका, असे एकाने म्हटलंय. मेल्यावर सरकारला प्रश्न विचारणार अशी कमेंटही एकाने केलीय. हेल्मेट नाही घातले, शूज नाही घातले कोणी तुमचे बघून केले तर? असा प्रश्न विचारला जातोय.
ओंकारचे स्पष्टीकरण
व्हिडीओ ट्रोलिंगवर ओंकारने स्पष्टीकरण दिले आहे. भारतात मोजून फक्त 100 हायलाईन चालणारे असतील. त्यातील एक @om_climb_n_slack. वर्षभर हायलाईनवर चालणारे आम्ही. म्हंटल मित्राचे लग्न होत आहे तर त्याच्यासाठी स्पेस नेट लावूयात. भारतात या खेळत फक्त 100 एक लोकं असतील.. याचे मुख्य कारण म्हणजे हायलाईन चालायला कौशल्य लागते. फक्त रॅपलिंग केल्यासारखे कोणीही नाही करू शकत. त्याचा सेटअप लावायला तांत्रिक ज्ञान लागते. आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण असलेले महागातले साहित्य लागते. या तिन्ही गोष्टी बरोबर घेऊन आम्ही हायलायनरवर स्पेस नेट लावली. त्या वर प्री वेडींग शूटिंग झाले. आता याला अनेक जण ट्रोल करत आहेत. हरकत नाही ट्रोल करत आहात तर.. पण आम्हाला मात्र आनंद आहे की या ना त्या कारणाने हायलाईनसारखा मोठा साहसी खेळ बऱ्याच लोकांपर्यंत पोहचतो आहे. हेल्मेट नाही घातले, शूज नाही घातले असले सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत त्या वर न बोललेले बरे..”कोणी तुमचे बघून केले तर?” असाही एक प्रश्न सारखा विचारला जातोय..पण आम्ही फक्त इव्हडेच करतोय का? वर्षभर टीम माणसांचे रेस्क्यू करते. प्राण्यांचे रेस्क्यू करते. या कधी आम्ही सह्यादी मधून वर्षाला किती मृतदेह काढतो बघायला. लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्वतःचे किती पैसे आणि वेळ खर्च करतो ते बघायला. आमचे बघून बाकीच्यांना बघू जमते का डेड बॉडी पॅक करायला? सोशल मीडियाच्या जमान्यात ट्रोलिंग तर होतंच राहणार. ट्रोल करणारा फोन वर टाईप करून मजा घेणार. आपण असे एकावर एक तांत्रिक साहसी प्रोजेक्ट करत राहायचे. आयुष्यात ज्याची जेवढी औकात तेवढेच तो करत असतो. कही जण फक्त ट्रोल करतात तर काही जण हायलाइनवर चालतात, असे ओंकारने त्याच्या पोस्टवर लिहिलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.