
जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. जालन्यातील एका बँक मॅनेजरला त्यांनी फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली आहे. त्यांच्यातील या संवादाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियाव
.
या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या विरोधामध्ये बँक कर्मचारी संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजप आमदार नारायण कुचे यांच्या अडचणीत वाढ होईल? अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका शेतकऱ्याच्या थकीत कर्ज प्रकरणात त्यांनी बँक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भातली संभाषणाची क्लिप देखील व्हायरल होत आहे. तुम्हाला समजून सांगितले तर समजत नसेल तर मला हाताने समजावून सांगावे लागेल. तुमची इच्छा असेल तर तिथे आल्यावर हाताने समजून सांगण्याची भाषा कुचे यांनी वापरली आहे. कुचे यांच्या क्लिप मुळे आता बँक कर्मचारी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.
कथित ऑडिओ क्लिप मध्ये नक्की काय संभाषण झाले ते देखील पहा..
आमदार कुचे – हॅलो, मॅनेजर साहेब आवाज येतोय आपल्याला? बँक मॅनेजर -हो सर नमस्कार. आमदार कुचे – तुम्ही राव आमचं काम ऐकत नाही.. माझ्या पद्धतीने तुमच्या ऑफिसमध्ये बँकेत यावं लागेल मला.. बँक मॅनेजर – सर ते आपल्या हातात नाही ना, मी हेड ऑफिसला त्यांची रिक्वेस्ट पाठवली आहे, रिक्वेस्ट लेटर.. आमदार कुचे – एवढी मस्ती आलेला मॅनेजर मी कधी पाहिला नाही… बँक मॅनेजर – ते सर थकीत असल्यामुळे, त्यांचे खाते फ्रीज आहे. आमदार कुचे – “तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय, एवढा माज ,एफ डी वाल्याला त्रास, ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा. “जसं काय तुमच्या बापाचा आहे. तुम्ही सरकारच्या जीवावर जितू राहिले. आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चढला आहे का तुम्हाला..? आमदार कुचे – तूला तीनदा समजून सांगितले..#####दुसरा फोन आहे हा.. बँक मॅनेजर – सर मी पाठवले आहे त्यांचे लेटर वरती.. आमदार कुचे -काय पाठवलं?#####नीट शिफारस कर ना.. जरा दाखवू का तुला.. रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली. बँक मॅनेजर – थकीत वाल्यांचे हेड ऑफिस वरून लॉक होत असतं, तिथून निघत असतं. त्यांचा अर्ज फॉरवर्ड केलेला आहे सर. आमदार कुचे – “मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी हाताने समजून सांगतो आल्यावर.. तुमची इच्छा असेल तिथे तर.. बँक मॅनेजर – पाठवले आहे सर वाटल्यास मी तिथला पण नंबर देतो. माझ्या ऑफिसचा.. आमदार कुचे – रोहित धुळे म्हणून आहे त्याला ग्राहक सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या तिथे. बँक मॅनेजर – हा हा हो सर… आमदार कुचे – ग्राहक सेवा केंद्र करून द्या त्याचं. पाठवतो मी त्याला आणि ते बँकेचे मार्गी लावा.. बँक मॅनेजर – ठीक आहे सर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.