digital products downloads

महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या! आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केला निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या! आगामी निवडणुका एकत्र लढण्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केला निर्णय

Maharashtra Local Body Election 2025 : स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नगर विकास विभागाचा सुधारित आदेश जारी केला आहे. यात 6 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात  हालचाली वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढण्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. 

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची चर्चा झाली. तसेच जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाल्याचे समजते. 

महायुतीला विधानसभा निवडणुकीचा कित्ता महापालिका निवडणुकीत गिरवायचा आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांची खलबतं झाली. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या चर्चेअंती महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.  लवकरच महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. 

दरम्यान, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ यांनी सूचक वक्तव्य केले होते. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसावा ही आमची इच्छा आहे असं  कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.  महापौर कोण होणार ? हे मुख्यमंत्री व महायुतीचे नेते ठरवतील असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.  मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. 

राज्यातील महानगरपालिकांचं निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. कारण नगरविकास विभागानं सुधारित जीआर काढलाय.. या जीआरमध्ये सर्व महानगरपालिकांना 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आलीय.. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांचं बिगुल दिवाळीनंतर वाजणार आहे.. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp