
Maharashtra SeaPlane News: देशातील पर्यटनाला चालना मिळावी. तसंच, दुर्गम भागातील पर्यटन अधिक वाढावे या हेतूने हा भाग हवाई सेवेने जोडण्यात येणार आहे. उडान 5.5 योजनेअंतर्गंत सी-प्लेन आणि हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू सुरू करण्यात येणार आहे. तसंच, देशभरात दीडशे ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. दुर्गम भागात हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.
देशभरात दीडशे ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील आठ ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे. उडान 5.5 योजनेत हेलिकॉप्टर आणि सी प्लॅन सेवाचा समावेश करण्यात आला आहे. विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी-प्लेन ही सुविधा सुरू करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान-निकोबार, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाण्याच्या नद्या, सरोवर आणि जलाशयातून ही वाहतून केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी कॅनडामधील डे हवेलांड एअरक्राफ्ट कंपनीचे विमाने वापरण्यात येणार आहेत. देशात इंडिको आणि पवनहंस या कंपन्या सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. सी प्लॅनचे तिकीट दीड ते दोन हजार रुपये असणार आहे. उडान योजनेअंतर्गत त्याला प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या ठिकाणी सुरू होणार सी-प्लेन वाहतूक
महाराष्ट्रातील धोम धरण वाई सातारा, गंगापूर धरण नाशिक, खिंडसी धरण नागपूर ,कोराडी धरण मेहकर बुलढाणा, पवना धरण पवनानगर पुणे , पेच धरण पारा शिवनी नागपूर , गणपतीपुळे रत्नागिरी, रत्नागिरी या ठिकाणाचा यात समावेश आहे.
कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणे होणार अधिक सोपे
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून निधी उपलब्ध केला जाईल, असा निर्णय रविवारी नागपूर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. कुंभमेळ्यामुळे रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना मदत करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार गडकरी, राज्य सरकार व संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.